मुक्तपीठ टीम
कल्याणमधील मलंगगड परिसरात फिरायला आलेल्या दोन तरुण आणि तरुणींना तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे याची तक्रार केली असता नेवाळे पोलीस स्टेशनल पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह तक्रार दाखल करुन न घेणाऱ्या पोलिसांवर देखील कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
- “मलंगगडमध्ये काही तरुण-तरुणींना मारहाण झाल्याची बातमी पाहिली.
- त्यांचा पेहराव हे मारहाणीचं कारण सांगितलं जात आहे.
- हे काय कपडे घातले आणि कसे घातले? असं स्थानिक मंडळींचं म्हणणं होतं.
- त्यावरुन वाद झाला आणि मुलं-मुली दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
- ते त्याच परिस्थितीत नेवाळे पोलीस स्टेशनला गेले.
- पोलिसांनीही दखल घेतली नाही, हे तर अतिशय गंभीर आहे.
- ज्यांनी मारहाण केली त्या समाजकंटकांवर तर कारवाई व्हायलाच हवी, पण ज्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये?
कारण ज्यावेळी मुलं-मुली तुमच्याकडे आली, त्यावेळी त्यांच्या हाता-पायाला लागलं होतं. पाठीवर वळ होते. काचेने कापलं होतं. अशी गंभीर परिस्थिती असताना त्यांना दिलासा देणं, तात्काळ गुन्हा नोंद करुन घेणं गरजेचं होतं.
राज्यात जर पोलीस संरक्षण देणार नसतील, तर प्रत्येकाने आपल्या हाती शस्त्र बाळगण्याची वेळ आलेली आहे” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
नेमकं काय घडलं?
- रविवारी सांयकाळच्या सुमारास दोन तरुण आणि दोन करुणी या मलंगगडच्या परिसरात फिरायला गेले होते.
- त्यावेळी सात – आठ तरुणांनी त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा कारण करत या चौघांना बेदम मारहाण केली.
- आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला.
- अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी आधी स्वतःची सुटका करून घेतली.
- त्यानंतर नेवाळी पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार होणार नाही.
- हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असं सांगत तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा दावा चौघांनी केला.
- मात्र, यातील पीडित तरुणीने हिंमत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली.
- त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.