Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तोकडे कपडे घातल्याने मारहाण, समाजकंटक आणि पोलिसांविरोधात चित्रा वाघांचा संताप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chitra wagh

मुक्तपीठ टीम

कल्याणमधील मलंगगड परिसरात फिरायला आलेल्या दोन तरुण आणि तरुणींना तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे याची तक्रार केली असता नेवाळे पोलीस स्टेशनल पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह तक्रार दाखल करुन न घेणाऱ्या पोलिसांवर देखील कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे.

 

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

  • “मलंगगडमध्ये काही तरुण-तरुणींना मारहाण झाल्याची बातमी पाहिली.
  • त्यांचा पेहराव हे मारहाणीचं कारण सांगितलं जात आहे.
  • हे काय कपडे घातले आणि कसे घातले? असं स्थानिक मंडळींचं म्हणणं होतं.
  • त्यावरुन वाद झाला आणि मुलं-मुली दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
  • ते त्याच परिस्थितीत नेवाळे पोलीस स्टेशनला गेले.
  • पोलिसांनीही दखल घेतली नाही, हे तर अतिशय गंभीर आहे.
  • ज्यांनी मारहाण केली त्या समाजकंटकांवर तर कारवाई व्हायलाच हवी, पण ज्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये?

 

कारण ज्यावेळी मुलं-मुली तुमच्याकडे आली, त्यावेळी त्यांच्या हाता-पायाला लागलं होतं. पाठीवर वळ होते. काचेने कापलं होतं. अशी गंभीर परिस्थिती असताना त्यांना दिलासा देणं, तात्काळ गुन्हा नोंद करुन घेणं गरजेचं होतं.
राज्यात जर पोलीस संरक्षण देणार नसतील, तर प्रत्येकाने आपल्या हाती शस्त्र बाळगण्याची वेळ आलेली आहे” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

नेमकं काय घडलं?

  • रविवारी सांयकाळच्या सुमारास दोन तरुण आणि दोन करुणी या मलंगगडच्या परिसरात फिरायला गेले होते.
  • त्यावेळी सात – आठ तरुणांनी त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा कारण करत या चौघांना बेदम मारहाण केली.
  • आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला.
  • अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी आधी स्वतःची सुटका करून घेतली.
  • त्यानंतर नेवाळी पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार होणार नाही.
  • हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असं सांगत तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा दावा चौघांनी केला.
  • मात्र, यातील पीडित तरुणीने हिंमत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली.
  • त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Tags: BJP chitra waghkalyanmalang gadकल्याणचित्रा वाघमलंगगड
Previous Post

आरबीआय अलर्ट: जुन्या नोटा बदलण्याच्या किंवा खरेदीच्या नावावर फसवणूक!

Next Post

आयकर विभागाची मुदतवाढ, ‘या’ कामांसाठी वाढवली अंतिम मुदत

Next Post
income tax offices

आयकर विभागाची मुदतवाढ, 'या' कामांसाठी वाढवली अंतिम मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!