Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयकर विभागाची मुदतवाढ, ‘या’ कामांसाठी वाढवली अंतिम मुदत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
income tax offices

मुक्तपीठ टीम

आयकर विभागाने मंगळवारी विविध कर-संबंधित प्रक्रियांची अंतिम मुदत वाढवली आहे. यामध्ये ‘इक्वलायजेशन शुल्क आणि रेमिटन्स’ संबंधित तपशील समाविष्ट आहेत. भारतातील परदेशी सेवा प्रदात्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर इक्वलायजेशन शुल्क टीडीएस कापले जाते. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी फॉर्म -१ मध्ये इक्वलायजेशन शुल्काचा तपशील दाखल करण्याची अंतिम मुदत ३० जून ते ३१ ऑगस्ट या मूळ मुदतीपासून वाढवण्यात आली आहे.

 

तिमाही रेमिटन्स ३१ ऑगस्टपर्यंत!

  • त्याचप्रमाणे एप्रिल-जून या तिमाहीसाठी रेमिटन्सच्या संदर्भात अधिकृत डीलर्सद्वारे सादर केलेल्या फॉर्म 15CC मधील तिमाही विवरणपत्रे आता ३१ ऑगस्टपर्यंत दाखल करता येतील.
  • हे तपशील सादर करण्याची मूळ तारीख १५ जुलै होती.
    सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने म्हटले आहे की, करदात्यांनी आणि इतर पक्षांनी निदर्शनास आणले होते की काही फॉर्म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्यासाठी काही समस्या येत आहेत.
  • हे पाहता हे फॉर्म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळेही मुदतवाढ

  • सीबीडीटीने पेन्शन फंड आणि गव्हर्नमेंट वेल्थ फंडद्वारे माहितीशी संबंधित इलेक्ट्रॉनिक फाईल भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • नवीन आयकर पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे, करदात्यांना अशा टाइमलाइनचे पालन करण्यात खूप अडचणी येत होत्या.
  • अनेक करदात्यांना निर्धारित तारखेच्या आत पालन करता आले नाही.

करदात्यांना दिलासा

  • कर प्रक्रियेसाठी मुदत वाढवल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळेल.
  • आयकर पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणींमुळे आधीच्या मुदतीचे पालन न केल्यामुळे दंडात्मक कारवाईपासून ते वाचतील.

Tags: income taxआयकर पोर्टलआयकर विभागसीबीडीटी
Previous Post

तोकडे कपडे घातल्याने मारहाण, समाजकंटक आणि पोलिसांविरोधात चित्रा वाघांचा संताप!

Next Post

सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्याचे महत्व किती?

Next Post
pm modi (2)

सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्याचे महत्व किती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!