मुक्तपीठ टीम
बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे सकाळी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. बराच काळ त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरु होते. अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत होते. गेल्या एका महिन्यात दिलीप कुमार यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि अखेर या महान ट्रॅजेडी किंगनं अखेरचं पॅक अप केलं. अवघ्या बॉलिवूडलाच नाही तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावत…वयानुसार काहीसं अपेक्षित पण तरीही मनाला न पटणारं!
पेशावरच्या मोहमंद युसूफ खान या पठाणाला बॉलिवूडनं संधी दिली. त्या संधीचं सोनं करत त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात शेवटचा शब्द असल्यासारखं उच्च स्थान मिळवलं. भारतीय चित्रपट रसिकांनी त्यांना दिलीप कुमार म्हणून आपलंसं केलं होतं.
कोरोनाचा काळ ट्रॅजेडीचा…
यापूर्वी कोरोनामुळे गेल्या वर्षी दिलीपकुमारचे दोन धाकटे भाऊ मरण पावले होते. २१ ऑगस्ट २०२० रोजी अस्लम यांचं वयाच्या ८८व्या वर्षी, २ सप्टेंबर २०२० रोजी एहसान यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे, सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरला आपल्या लग्नाचा ५४वा वाढदिवस साजरा केला नव्हता.
पेशावरमध्ये जन्म
दिलीप कुमारांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावर येथे झाला होता. त्यांनी नाशिक येथे शिक्षण घेतले. वयाच्या २२व्या वर्षी दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट आला.
सुमारे ६० चित्रपटांमध्ये काम केले
दिलीप कुमार यांनी पाच दशकांच्या कारकीर्दीत सुमारे ६० चित्रपट केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील बर्याच चित्रपटांना नाकारले होते, कारण चित्रपट कमी पण चांगले असावेत असा त्यांचे मत होते.
१९९१: पद्मभूषण
१९९४: दादासाहेब फाळके
२०१५: पद्म विभूषण
दहा फिल्मफेअर पुरस्कार
१९५४: सर्वोत्कृष्ट अभिनेता (दाग)
१९५६: सर्वोत्कृष्ट अभिनेता (अंदाज)
१९५७: सर्वोत्कृष्ट अभिनेता (देवदास)
१९५८: सर्वोत्कृष्ट अभिनेता (नया दौर)
१९६१: सर्वोत्कृष्ट अभिनेता (कोहिनूर)
१९६५: सर्वोत्कृष्ट अभिनेता (नेता)
१९६८: सर्वोत्कृष्ट अभिनेता (राम और श्याम)
१९८३: सर्वोत्कृष्ट अभिनेता (शक्ती)
१९९४: लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार
२००५: विशेष पुरस्कार
गोल्डन ज्युबिली हिट्स
जुगनू, मेला, अंदाज, आन, दीदार, आजाद, मुगल-ए-आजम, कोहिनूर, गंगा-जमना, राम और श्याम, गोपी, क्रांति, विधाता, कर्मा आणि सौदागर
सिल्वर ज्युबिली हिट्स
शहीद, नदिया के पार, आरजू, जोगन, अनोखा प्यार, शबनम, तराना, बाबुल, दाग, उड़न खटोला, इंसानियत, देवदास, मधुमती, यहूदी, पैगाम, लीडर, आदमी, संघर्ष
विनोदी भूमिका
शबनम, आजाद, कोहिनूर, लीडर, राम और श्याम, गोपी
संतप्त भूमिका
आन, आजाद, कोहिनूर, क्रांति
नकारात्मक भूमिका
फुटपाथ, अमर
अर्धवट चित्रपट
काला आदमी, जानवर, खरा-खोटा, चाणक्य-चंद्रगुप्त, आखिरी मुगल आणि कलिंगा