मुक्तपीठ टीम
अमेरिकेनं महासत्ता असूनही कोरोनाचा मोठा फटका झेलला. त्यातून धडा घेत कोरोनाविरोधी लस तयार करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सचा निधी देत संसोधन घडवलं. त्यातून आज अमेरिकेकडे पाच लसी आहेत. पुढचं पाऊल उचलत अमेरिकेनं ३ अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून कोरोनाविरोधी गोळ्या तयार करण्यासाठी संशोधकांच्या टीम काम करत आहेत. काही कंपन्या या गोळ्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स लवकरच सुरु करणार आहेत. त्या जर यशस्वी झाल्या तर वर्षाच्या अखेरीस गोळ्या उपचारासाठी उपलब्ध होतील.
लवकरच क्लिनिकल चाचण्या
- अमेरिकत संशोधन सुरु असलेल्या गोळ्या या कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी करण्यावर काम करतील.
- त्यामुळे कोरोना संसर्ग झाल्यावर होणारी बाधिताच्या शारीरिक हानीवर नियंत्रण येऊ शकेल.
- अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिस म्हणजेच डीएचएचएस हा कोविड-1 गोळी कार्यक्रम राबवत आहे.
- कोरोनाविरोधी लसीच्या संशोधनाचे काम वेगानं होण्यासाठी खासगी फार्मा कंपन्यांना १ अब्ज डॉलर्सचा निधी देण्यात आला होता, तसेच आता कोरनाविरोधी गोळीच्या संशोधनासाठी ३ अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे.
- काही कंपन्या लवकरच गोळ्यांच्या चाचण्या करण्याचे काम सुरू करणार आहेत.
- त्यांच्या चाचण्या योग्यप्रकारे पुढे गेल्या तर या वर्षाच्या अखेरीस काही गोळ्या बाजारात येतील.
इतर संभाव्य रोगांवरही औषधे शोधण्याचा प्रयत्न
- या संशोधन कार्यक्रमात केवळ कोरोनावरच नव्हे तर भविष्यात माणसांना अतिशय बाधक ठरू शकणाऱ्या संभाव्य रोगांसाठी औषधे शोधण्याचा प्रयत्न होणार आहे.
- या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्फ्लूएन्झा, एचआयव्ही आणि हिपॅटायटीस सारख्या जीवघेण्या आजारासाठी औषधे म्हणजेच गोळ्या तयार केल्या जातील.
- हे संशोधन वर्षभरापासून सुरु होते, परंतु कोरोना येण्यापूर्वी इतर रोगांच्या गोळ्या तयार करण्यात यश मिळू शकले नाही.
- आता हे काम मिशन मोडवर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.