मुक्तपीठ टीम
भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकारी प्रथमच हेलिकॉप्टरने उड्डाण करणार आहे. हे भारतीय सैन्यांच्या इतिहासात पहिल्यादांच घडले आहे. नाशिकच्या गांधीनगर येथील कॅट्सच्या रन-वे वरून हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण या महिलांना दिले जाणार आहे.
आकाशी भिरभिरण्याची जिद्द
• आर्मी एव्हिएशनच्या एका वर्षाच्या कोर्समध्ये सामील होण्यासाठी १५ महिला अधिकाऱ्यांनी अर्ज केले होते.
• ही निवड प्रक्रिया कठीण असल्याने यामध्ये केवळ दोन महिला अधिकाऱ्यांनाचा प्रवेश मिळाला.
• या निवड प्रक्रियेत ‘पायलट एप्टीट्यूड बॅटरी टेस्ट’ आणि मेडिकल टेस्टचा समावेश होता.
• या बॅचमध्ये ४७ अधिकाऱ्यांचा समावेश असून जूलैमध्ये सुरु होणारे हे प्रशिक्षण जुलै २०२२ मध्ये पूर्ण होईल.
लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेंमुळे महिला शक्ती आकाशात
• आतापर्यंत सैन्यात एव्हिएशन विंगमध्ये तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आतापर्यंत फक्त एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा ग्राऊंड ड्युटीवरच लावण्यात येत होते.
• महिला अधिकाऱ्यांना आर्मी एव्हिएशन संघात निवड करण्यासाठी परवानगी देण्याच्या प्रस्तावाला लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मान्यता दिली होती.
• सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्ये संसदेला सांगितले की सैन्य, नौदल आणि हवाई दलात सध्या ९,११८ महिला आहेत.