Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अशी असावी सून! कोरोनाग्रस्त सासऱ्यांना पाठीवर घेऊन २ किमी चालली!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Niharika Das

मुक्तपीठ टीम

सून असावी तर अशी! सहजच ओठी येतं. आज मुक्तपीठ ज्या सुनेची सत्यकथा सांगतेय ती सून आहेच तशी. सध्या एक छायाचित्र खूप व्हायरल होत आहे. एक महिला एका पुरुषाला पाठीवर घेऊन जात असल्याचे ते छायाचित्र आहे. आसाममधील नागाव येथे राहणाऱ्या २४ वर्षांच्या निहारिका दास यांचे. छायाचित्रात त्या आपल्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठीवर घेऊन जाताना दिसत आहे. निहारिका तिच्या सासऱ्यांना पाठीवर घेऊन जवळजवळ २ किमी चालली. यादरम्यान लोकांनी फोटो काढले पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. निहारिकाने धोका पत्करत सासऱ्यांना रुग्णालयात पोहचवले. मात्र, इतके प्रयत्न करूनही निहारिका आपल्या सासऱ्यांना वाचवू शकली नाही. तिचे सासरे थुलेश्वर दास यांचा मृत्यू झाला. पण छायाचित्रांमुळे निहारिका जगभर चर्चेत आली. ते छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर लोक आता निहारिकाला आदर्श सून म्हणत आहेत. प्रत्येकाच्या ओठी येतंच येतं…शाबास सुनबाई!

 

सूनबाईची भन्नाट कहाणी

• निहारिका दास या आसाममधील नगावला राहतात.
• २ जून रोजी निहारिकाचे सासरे थुलेश्वर दास यांना कोरोनाची लक्षणे आढळली. थुलेश्वर राहा परिसरातील भाटिगाव येथील सुपारी विक्रेता होते.
• त्यांची तब्येत खराब झाली असता, सून निहारिकाने त्यांना २ किमी दूर राहाच्या आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रिक्षाची व्यवस्था केली.
• रिक्षा घरा पर्यंत येऊ शकेल असा कोणता रस्ता नाही आहे.
• तिच्या सासर्‍यांची अवस्थाही चालण्यास योग्य नव्हती.
• निहारिकाचा नवरा कामासाठी सिलीगुडी येथे राहतो.
• अशा परिस्थितीत सासऱ्यांना पाठीवरून घेऊन जाण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. तिने तिच्या सासर्‍यांना पाठीवर घेऊन रिक्षा स्टँडवर नेले.

 

निहारिकाला एक ६ वर्षाचा मुलगा आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार त्रास येथेच संपला नाही. आरोग्य केंद्रात सासऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. सासऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्यांना २१ किमी अंतरावर नागावच्या कोरोना रुग्णालयात नेण्यास सांगितले. तसेच त्यांना आरोग्य केंद्रातून रूग्णवाहिका किंवा स्ट्रेचर देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी खासगी कारची व्यवस्था केली. यासाठीसुद्धा तिला सासर्‍यांना पाठीवरुन लांब पळत घेऊन जावे लागले. लोक बघत होते, परंतु कोणीही मदत केली नाही. सासऱ्यांना उचलण्यासाठी तिला मानसिक आणि शारीरिक बरीच बरीच शक्ती लागली. असे तिने सांगितले.

 

रुग्णालयातही पाठीचेच केले स्ट्रेचर

• निहारिका म्हणाली की, “नागाव येथे पोहोचल्यावरही पाठीवरून सासऱ्यांना पायऱ्या चढून कोरोना रुग्णालयात जावे लागले.
• तिथे मी मदतीसाठी विचारणा केली पण कोणीही पुढे आले नाही.
• मला वाटते की, त्या दिवशी मी सासर्‍यांना पाठीवरुन घेऊन २ किमी चालली.
• या दरम्यान कोणीतरी निहारिकाचा फोटो काढला असावा.
• निहारिकासुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे.
• सोशल मीडियावर तिची आदर्श सून म्हणून वर्णन केले जात आहे.
• आता तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

आसामच्या या कथेने गावातील आरोग्य सेवेचे भीषण वास्तव उघडकीस आणले आहे. निहारिका म्हणाली की, “तिला गावात रुग्णवाहिकासुद्धा मिळाली नाही. एका छोट्या व्हॅनमधून त्यांना शहरात आणावे लागले. चांगली गोष्ट अशी आहे की, या काळात सासऱ्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली नाही. मात्र, दोघांनाही ५ जूनला गुवाहाटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, तिथे थुलेश्वर दास यांचा मृत्यू झाला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: assamcoronaNiharika Dassocial mediaviralआसामकोरोनानिहारिका दास
Previous Post

नाशिकमध्ये नवीन रुग्ण वाढल्यानं राज्याचा आकडा वाढला! ३ जिल्हे एक आकडी!!

Next Post

भारतीय लष्करातील महिला अधिकारी प्रथमच चालवणार हेलिकॉप्टर

Next Post
indian army

भारतीय लष्करातील महिला अधिकारी प्रथमच चालवणार हेलिकॉप्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!