मुक्तपीठ टीम
देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीसे आपल्या ग्राहकांना “तोंड बंद ठेवा” असा सल्ला दिला आहे. ऐकून विचित्र वाटत असेल ना पण हा सल्ला ग्राहकांच्या फायदाचा आहे. कारण, ऑनलाइन फसवणूकीपासून वाचण्यासाठी बँकेने ग्राहकांना हा सल्ला वजा इशारा दिला आहे.
एचडीएफसीच्या ट्विटमध्ये काय?
• तुम्हाला एफडी/आरडी ट्रान्जेक्शनचा मॅसेज आला आहे का?
• सायबर गुन्हेगार एचडीएफसी बँकेच्या बनावट हेल्पलाइन नंबरचा उपयोग करत आहेत.
• तसेच ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना स्क्रीन-शेअरिंग अॅप डाउनलोड करण्याासाठी सांगत आहेत.
• त्यामुळे असे सायबर गुन्हेगारांना आपल्याशी संपर्क साधला तर #MoohBandRakhe म्हणजेच “तोंड बंद ठेवा”.
Received a message for an FD/RD transaction you didn’t make?
Scamsters are using fake HDFC Bank helpline numbers & asking people to download screen-sharing app to access their banking information. So practice #MoohBandRakho when the scamsters call.Visit: https://t.co/RPuqV7Bz07 pic.twitter.com/3fTIKiOfuO
— HDFC Bank (@HDFC_Bank) June 2, 2021
कोरोना संकटात सर्वाधिक फसवणुकीची प्रकरणे
• मागील वर्षी कोरोनाच्या संकट काळात फसवणूकीचे अनेक प्रकरणे समोर आली होती.
• एप्रिल-जून २०२० मध्ये १९,९६४ कोटी रुपयांच्या फसवणूकीचे एकूण २,८६७ प्रकरणे समोर आली होती.
• १२ सरकारी बँकांपैकी एसबीआयमध्ये सर्वात जास्त म्हणजेच २,०५० फसवणूकीची प्रकरणे समोर आली होती.