मुक्तपीठ टीम
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी चलनी नोटा सॅनिटायझेशन करून किंवा धुऊन आणि इस्त्री केल्या जात असल्याने रिझर्व्ह बँकेला मोठा फटका बसत आहे. संसर्गाच्या भीतीने केल्या जाणाऱ्या उपायांमुळे नोटांचा रंग उडत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, याआधी नोटा खराब होण्याचे प्रमाण कधीच इतके नव्हते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात केवळ दोन हजार रुपयांच्या सहा लाख नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या, तर कोरोना संकटाच्या २०२०-२१ या एका आर्थिक वर्षात ४५.४८ कोटी मूल्याच्या खराब नोटा नष्ट कराव्या लागल्या आहेत.
कोरोना संकटाच्या काळात वाढले नोटांचे खराब होणे!
• २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात २०० रुपयांच्या केवळ एक लाखांच्या नोटा खराब झाल्या होत्या.
• कोरोना संकटाच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ही संख्या वाढून ११.८६ कोटी झाली आहे.
• पाचशेच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण ४० पटींनी वाढली आहे.
• छोट्या मूल्यांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण अर्ध्यापेक्षा कमी आहे.
• कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी लोक मोठ्या प्रमाणात नोटा सॅनिटायझेशन करून किंवा धुऊन आणि इस्त्री करीत आहेत. त्यामुळे नोटा खराब होत आहेत.
छोट्या नोटा सुरक्षित राहिल्या
• २०१९-२० च्या तुलनेने २०२०-२१ मध्ये २००० च्या नोटा अडीचपट जास्त खराब झाल्या आहेत.
• ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा साडे तीन पट खराब झाल्या आहेत.
• लोकांनी जास्त मूल्यांच्या नोटांना सॅनिटाईझ केल्याने आणि बरेच दिवस तसेच ठेवल्याने त्या खराब झाल्या आहेत.
• कमी मूल्यांच्या नोटा रोज एक-दुसऱ्यांच्या हाती जात असतात, त्यामुळे हवा लागत असल्याने त्या खराब झाल्या नसाव्यात.