मुक्तपीठ टीम
एखाद्याला कोरोना झाली की नाही ते जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्यांचे पर्याय आहेत. आता या चाचण्यांमध्ये भर पडली आहे ती प्रशिक्षित श्वान पथकांची. आजवर गुन्हेगार, अंमलीपदार्थ आणि स्फोटके शोधण्यासाठी उपयोगी पडणारे प्रशिक्षित श्वान कोरोना संसर्ग शोधण्यासाठीही उपयोगी ठरणार आहेत. फ्रांसमधील शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात तसे आढळून आले आहे.
घामाचा वास, कोरोनाचा शोध
• कोरोना संसर्गित माणसांचा शोध घेण्यासाठी श्वान उपयोगी ठरत आहेत.
• आरटीपीसीआरच्या तपासणीप्रमाणेच मानवांमध्ये कोरोना शोधण्यास हे कुत्रे अधिक सक्षम आहेत.
• फ्रेंच शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले आहे की, कोणत्याही वासावरून शोध लावणारे प्रशिक्षित श्वान माणसाच्या घामाच्या वासाने त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचा अचूक अंदाज बांधू शकतात.
• इतकेच नाही तर, हे कुत्रे काही मिनिटांतच कोरोना स्क्रिनिंग करण्यास सक्षम असतात. तेवढी अचूक नसणाऱ्या रॅपिड अँटीजन चाचणीने संसर्ग शोधण्यासाठीही किमान १५ मिनिटे लागतात.
पॅरिसमधील नॅशनल व्हेटरनरी स्कूल ऑफ अल्फोर्ड येथील संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळले आहे की, कुत्रे त्यांच्या वास घेण्याच्या शक्तीमुळे माणसांमधील ९७% कोरोना विषाणूचा शोध घेऊ शकतात. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाविरूद्ध मानवी शरीरातून स्त्रवणारा त्यांच्या घाम आणि लाळेमध्ये परिणाम होतो. हा परिणाम कुत्र्यांना वासाने ओळखता येतो.
संशोधक डॉमिनिक ग्रँडजीन सांगते की, “आतापर्यंत कुत्र्यांना स्फोटके किंवा ड्रग्ज शोधण्यासाठीच प्रशिक्षण दिले गेले आहे, परंतु प्रथमच कोरोना हा विषाणूजन्य आजार शोधण्यासाठी त्यांची वास घेण्याची क्षमता वापरली जात आहे. पेनोसोल्वेनिया स्कूल ऑफ व्हेटरनरी मेडिसिन डॉग सेंटरतर्फे कुत्र्यांच्या वासाच्या क्षमतेबद्दल आणखी एक संशोधन केले गेले आहे, हे कुत्रे लसीकरण केलेल्या लोकांना आणि संसर्गित लोकाना वास घेऊन शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. हे शक्य झाल्यास अशा प्रशिक्षित कुत्र्यांची मागणी आणखी वाढेल.
आंतरराष्ट्रीय टास्क फोर्समध्ये असे आढळले आहे की, तपास घेणारे हे कुत्रे एका दिवसात ३०० माणसांची कोरोना स्क्रिनिंग करू शकतात. ज्याप्रमाणे अॅन्टीजन चाचणीसाठी नाकातून स्वॅबचा नमुना घेणे आवश्यक आहे, तसेच यासाठी संपर्क साधण्याची गरज नाही आणि कोरोनाची चाचणीही अगदी कमी वेळेत कोली जाते.
फिनलँडच्या हेलसिंकी-वांता या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोना संसर्गित प्रवाश्यांना शोधण्यासाठी सर्च डॉग तैनात केले आहेत. इतर अनेक देशांमध्ये मानवांमधील कोरोनाचा संसर्ग वासाद्वारे ओळखण्यासाठी स्निफर कुत्र्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे.
कुत्र्यांमध्ये मानवांपेक्षा एक हजार पट जास्त वास घेण्याची क्षमता असते, कुत्र्यांची ही शक्ती आता मधुमेहापासून मलेरिया या आजारांपर्यंतचे रोग शोधण्यासाठी वापरली जात आहे.