मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाने हाहाकार माजलेला आहे. यामुळे लसाकरणाचा वेग वाढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यातच आता लस निर्माता कंपनीकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्ना आपली सिंगल डोस लस पुढील वर्षापर्यंत भारतात उपलब्ध करू शकते, यासाठी मॉडर्ना सिप्ला आणि इतर फार्मा कंपन्यांच्या संपर्कात आहे. तसेच अमेरिकन फार्मा कंपनी फायझर यावर्षी भारताला लशीचे पाच कोटी डोस देण्या तयारीत आहे, मात्र भारताला लस देण्यापूर्वी फायझरला नियमांत काही प्रमाणात सूट हवी आहे.
फायझर यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये लसींचे पाच कोटी डोस भारताला देण्यास तयार झाली आहे. मात्र, यासाठी कंपनीला नुकसान भरपाईसोबतच महत्वपूर्वक नियमांत काही प्रमाणात सूट हवी आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉडर्नाने भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, सध्या त्यांच्याकडे सरप्लससाठी लसी नाहीत यामुळे भारताला यावर्षी लस देता येणार नाही. तसेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनेसुद्धा इतर देशांना लसी पुरवण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली आहे.
सिल्पानेही मॉडर्ना लस खरेदीची दाखवली तयारी
- रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला भारताने आप्तकालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.
- परंतु त्याचा पुरवठा मर्यादीत आहे.
- याच दरम्यान, सिप्लाने मॉडर्ना कंपनीकडून २०२२मध्ये तब्बल पाच कोटी लस खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे.
- तसेच आरोग्य मंत्रालयाकडूनही मॉडर्नाला सिल्पाने लस खरेदीत दाखवलेल्या तयारीला सहकार्य करण्यासाठी कंपनीला लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.
फायझर या टप्प्यात लस पुरवेल
- फायझरच्या लसीबद्दल बोलाचे झाल्यास कंपनीने या वर्षी पाच कोटी लसीचा पुरवठा करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
- प्रत्येकी एक कोटी डोस जुलै-ऑगस्टमध्ये, २ कोटी डोस सप्टेंबरमध्ये तर एक कोटी डोस ऑक्टोबरमध्ये भारतात येऊ शकतात.