Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रामदेव बाबांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आयएमएची पंतप्रधान मोदींकडे मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ramdev baba (2)

मुक्तपीठ टीम

योगगुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसत आहे. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आयएमएने नाराजी व्यक्त केली आहे. बाबा रामदेव यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींकडेही तक्रार करण्यात आली आहे. आयएमएने पंतप्रधान मोदींकडे रामदेव बाबांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आयएमएने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून म्हटले आहे की, “पतंजलीचे मालक रामदेव बाबाकडून लसीकरणासंबंधित चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, हे रोखले पाहिजे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असूनही १०,००० डॉक्टर आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा. ”

अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी बाबा रामदेव यांनी १५ दिवसात माफी मागितली नाही तर १ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा आता आयएमएने रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. आयएमए (उत्तराखंड) चे सचिव अजय खन्ना यांनी दिलेल्या ६ पानी नोटिसात त्यांचे वकील नीरज पांडे यांनी रामदेव बाबांच्या वक्तव्यावर अ‍ॅलोपॅथी आणि असोसिएशनशी संबंधित सुमारे २००० डॉक्टरांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन केल्याचे म्हटले आहे.

भारतीय दंड संहिता कलम ४९९ अन्वये योगगुरूची टिप्पणी ‘गुन्हेगारी कारवाई’ असल्याचे वर्णन करताना रामदेव बाबांकडे नोटीस मिळाल्याच्या १५ दिवसांच्या आत ‘लेखी माफी’ मागितली आहे आणि असे म्हटले आहे की जर तसे झाले नाही तर १००० कोटी रुपये नुकसान भरपाई द्या. या नोटीसमध्ये रामदेव बाबांना सांगितले की त्यांच्यावरील केलेल्या सर्व खोटे आणि निंदनीय आरोपांचे खंडन करून व्हिडिओ क्लिप बनवण्यास सांगितले आहे आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सांगितले आहे.


Tags: baba ramdevIMAPM Narendra modiअॅलोपॅथीइंडियन मेडिकल असोसिएशनपंतप्रधान मोदीबाबा रामदेव
Previous Post

फक्त पाच दिवस…बॅकअप घ्या…नाहीतर या सेवेचे पैसे भरा!

Next Post

फायझरची भारताला ५ कोटी डोस देण्याची तयारी, मॉडर्ना पुढच्या वर्षी!

Next Post
pfizer

फायझरची भारताला ५ कोटी डोस देण्याची तयारी, मॉडर्ना पुढच्या वर्षी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!