मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ओटीटीवर नवनवीन चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत. अॅमेझॉन ओरिजिनलने विद्या बालन प्रमुख भूमिकेत असणाऱ्या ‘शेरनी’ या चित्रपटाच्या स्ट्रिमिंगची घोषणा केली आहे. अॅमेझॉन प्राईमने म्हटले आहे की, हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित केला जाणार आहे. ‘शेरनी’ हा चित्रपट अमित मसुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहेत तर सोबतच शरद सक्सेना, मुकूल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार दिसणार आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटात विद्या बालन एक निश्चयी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, जी कठीण प्रसंगी निष्ठेने आपले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करीत आहे.
तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडियाचे विजय सुब्रहमण्यम म्हणाले की, ‘शकुंतला देवी’ या चित्रपटाच्या यशानंतर भारतासह संपूर्ण जगभरातील आपल्या यूजर्ससाठी विद्या बालन प्रमुख भूमिकेतील ‘शेरनी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूप उत्सुक आहोत.
जगभर पोहचणार ‘शेरनी’
- टी-सीरीजचे निर्माते भूषण कुमार यांनी ‘शेरनी’ चित्रपटबद्दल म्हटले की, आतापर्यंत ज्या चित्रपट्यांच्या निर्मितीची संधी मिळाली, त्यातील ‘शेरनी’ हा चित्रपट सर्वांचे मंनोरजन करणारा आहे.
- अॅमेझॉन प्राईमवर याचे स्ट्रिमिंग होणार आहे, त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे.