मुक्तपीठ टीम
कोरोनाची कसलीही लक्षणे नाहीत. आणि अचानक तब्येत बिघडते. इतकी बिघडते की काहींचे बळीही जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असं घडू लागले आहे. यात बळी जात आहेत, ते तरुणांचे. आपल्याला काहीच झालेले नाही अशा गोड गैरसमजातून हे तरुण बेसावध पण आनंदी राहत असल्याने या स्थितीला डॉक्टरांनी हॅप्पी हायपोक्सिया नाव दिले आहे. खरंतर सर्वांनीच या गैरसमजापासूनही सावध राहण्याची गरज आहे.
हॅप्पी हायपोक्सिया आहे तरी काय?
- हायपो (HYPO) म्हणजे कमी आणि अॅक्सिया (OXIA) म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण.
- शरीरातील अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम रक्ताद्वारे केले जाते.
- मात्र ‘हॅप्पी हायपोक्सिया’मध्ये शरीरातील पेशींना हवं असलेलं ऑक्सिजन रक्ताद्वारे पुरेशा प्रमाणात वाहून नेलं जात नाही.
- हॅप्पी हायपॉक्सियाग्रस्त रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असते.
- रुग्णांमध्ये संसर्ग असूनही, लक्षणे सुरुवातीला दिसत नाही.
- जेव्हा लक्षणे समोर येतात, तेव्हा संसर्गग्रस्त तरूणाची प्रकृती २४ ते ४८ तासांच्या आत खालावते.
- त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते.
- ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असतात किंवा नसतात, त्यांची ऑक्सिजनची पातळी अचानक कमी होत जाते.
- अशा परिस्थितीत शरीराचे अनेक महत्त्वाचे अवयव काम करणे थांबवतात आणि अचानक काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो.
- दुसऱ्या स्टेजमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागतो.
- तिसरी स्टेज म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थितीत व्हेन्टिलेटरची गरज लागते.
- हॅप्पी हायपोक्सिया तरुणांसाठी जीवघेणा बनला आहे.
रुग्णाला धोक्याची चाहुलही लागत नाही
- कोरोनाच्या दुसर्या लाटेत हॅप्पी हायपोक्सियामुळे अनेक तरुणांचे मृत्यू झाले.
- वेळोवेळी शरीराची ऑक्सिजनची पातळी तपासून ही परिस्थिती टाळता येऊ शकते.
- यातले पाच टक्के रुग्ण कोरोनाच्या हॅप्पी हायपोक्सियाचे बळी ठरले आहेत.
- सामान्य माणसाची ऑक्सिजन पातळी ९५ ते १०० टक्क्यांच्या दरम्यान असते.
- रुग्णाच्या शरीरात संसर्गामुळे, त्याची ऑक्सिजनची पातळी खाली येते.
- ऑक्सिजनची पातळी ७० ते ८० पर्यंत पोहोचली तरीही रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत नाही.
- शरीरात कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढते.
- शरीरात ऑक्सिजन कमी होतो आणि कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढते.
- अशा परिस्थितीत फुफ्फुसांमध्ये सूज येते तेव्हा रक्तात ऑक्सिजन मिळत नाही.
- मेंदूत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशी खराब होतात.
- शरीर खराब होऊ लागते. रुग्णांची चिडचिड होते.
- ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास श्वास घेण्यात अडचण येते.
‘हॅप्पी हायपोक्सिया’ची लक्षणे कोणती?
- हृदयरोग आणि फुफ्फुसाचा आजार असलेल्या काही रुग्णांमध्ये हॅप्पी हायपॉक्सिया आढळून येतो.
- हिमोग्लोबिनची कमतरता, छातीचा आकार, योग्य पद्धतीने ऑक्सिजन बाइंडिंग न होणं यामुळेदेखील हॅप्पी हायपॉक्सिया होवू शकतो.
- त्वचेचा रंग बदलणं,
- गोंधळाची परिस्थिती
- कफ, हृदयाचे ठोसे अचानक वाढणं
- जोर-जोरात श्वास घेणं
- अचानक खूप घाम येणं
- हॅप्पी हायपॉक्सिया’पासून कशी दक्षत घ्यावी?
- शरीरातील ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणे
- ऑक्सिजन पातळी घरीही मोजणे शक्य आहे.
- ‘पल्स ऑक्सिमीटर’च्या मदतीने पातळी तपासू शकतो.
- दिवसातून दहावेळा आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासा.