Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लातूर जिल्ह्यात कृषी विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार होणार

पालकमंत्री मंत्री अमित देशमुखांचे आदेश

May 6, 2021
in सरकारी बातम्या
0
amit deshmukh

मुक्तपीठ टीम

 

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सेद्रिंय, जैविक खतांचा वापर, कृषीउद्योग उभारणी, त्यासाठी नियमीत वीज व कर्जपुरवठा आणि विकेल ते पिकेल या धोरणानुसार पिकांची लागवड, या प्रमुख गोष्टी व त्याच्याशी निगडीत सर्व बाबींचा समावेश करून लातूर जिल्हा कृषी विकासाच्या अनुषंगाने पाच वर्षाचा बृहत विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दुरदृश्य प्रणालीव्दारे घेण्यात आलेल्या सन २०२१ खरीप हंगाम पूर्वनियोजन आढावा बैठकी दरम्यान दिले आहेत.

 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आणि सलग साडेतीन तास उपयुक्त मुददयांवर चर्चा झालेल्या या सन २०२१ खरीप हंगाम पूर्वनियोजन आढावा बैठकीस खासदार सुधाकर श्रृगारे, खासदार ओमराजे निबाळकर, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धिरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., कृषीविकास अधिकार गवसाने यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत बोलतांना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, यावर्षी चांगला आणि वेळेत पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कृषी विभागाने आत्ताच तातडीने खरीप पेरणीसाठी गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता करून ठेवणे आवश्यक आहे. रासायानिक खतांचाही गरजेनुसार साठा करून ठेवावा लागेल, मागच्या वर्षी प्रमाणे बियाणे उगवले नाही, अशा तक्रारी येऊ नयेत म्हणून कृषी विभागाच्या गुणवत्ता तपासणी यंत्रणेने प्रमाणित बियांण बरोबरच सत्यप्रत बियाणांच्या दर्जावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.

 

मागच्या वर्षांत ज्या शेतकऱ्यांचे उगवले नाही त्या आपादग्रस्थ शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी संबंधित कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून दयावी, नुकसान भरपाई न देणाऱ्या बियाणे कंपन्याचे परवाने रद्द करावे, दुबार पेरणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना हवामान अंदाजाची नियमित माहिती दयावी, राष्ट्रीयकृत बॅंकांनी पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यात बियाणे उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे, प्रलंबित विज जोडणी पंधरा दिवसात पूर्ण कराव्यात, जिल्हयात वेअरहाऊस संबंधी मास्टर प्लॅन तयार करावा, तालुकानिहाय वैशिष्ट्यानुसार शेती ऊतपादनाचे क्लस्टर तयार करावे, कृषी सहायकांना सेवेच्या ठिकाणी रहाणे अनिवार्य करावे, सौर पंप उभारणीसाठी नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी, केरळच्या धर्तीवर भाजीपाल्याला हमीभाव मिळण्यासाठी लातूर जिल्हयाने प्रस्ताव तयार करून राज्यशासनाकडे सादर करावा, आदी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी या बैठकी दरम्यान दिल्या आहेत.

 

या बैठकी दरम्यान लोकप्रतिनिधींनी केलेल्या सर्व सुचनांची नोंद घ्यावी. त्यावर तातडीने कार्यवाही करून आठ दिवसात त्यांना कार्यअहवाल त्यांच्याकडे पाठवावा. तुती लागवड, राष्ट्रीकृत बॅंकाचे पिक कर्ज वाटप, शेततळ्यांची मोहिम, कृषीउद्योग उभारणी, कृषीवीज पुरवठा, कृषी मालाची निर्यात या व इतर शेतीशी संबंधित महत्वाच्या विषयावर जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून स्वतंत्र बैठकाचे आयोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी बैठकी दरम्यान दिले आहेत.

 

कृषि विकासाचा आराखडा असणार कसा?

१. प्रमाणित व सत्यप्रत बियाण्याच्या दर्जावर बारीक लक्ष ठेवा

२. मागच्या वर्षांतील अपादग्रस्थ शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी नुकसान भरपाई मिळवून दयावी

३. नुकसान भरपाई न देणाऱ्या बियाणे कंपन्याचे परवाने रद्द करावे

४. दुबार पेरणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना हवामान अंदाजाची नियमित माहिती द्यावी

५. राष्ट्रीयकृत बॅकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे.

६. जिल्हयात बियाणे ऊत्पादनाला प्रोत्साहन दयावे

७. प्रलंबित वीज जोडणी पंधरा दिवसात पूर्ण कराव्यात

८. जिल्ह्यात वेअरहाऊस संबंधी मास्टर प्लॅन तयार करावा

९. तालुकानिहाय वैशिष्ट्यानुसार शेती ऊतपादनाचे क्लस्टर तयार करावे

१०. कृषी सहायकांना सेवेच्या ठिकाणी राहणे अनिवार्य करावे

११. सौर पंप उभारणीसाठी नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी

१२. भाजीपाल्याला हमीभाव मिळण्यासाठी प्रस्ताव द्यावा


Tags: Agricultural Development PlanAmit deshamukhअमित देशमुख
Previous Post

महाराष्ट्रात आज ६३ हजार ८४२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले! ६२ हजार नवे रुग्ण!

Next Post

“कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांसाठी १४१ कोटी ६४ लाख निधी” -विजय वडेट्टीवार

Next Post
vijay

"कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांसाठी १४१ कोटी ६४ लाख निधी" -विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!