सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. व्यायाम, योग वगैरेही संकल्प करुनही केले जात नाहीत. त्यामुळे साधं चालण्यानं जर फायदा होत असेल तर ते प्रत्येकजण करू शकतो. चालणे हे कधीही शरीरासाठी चांगलेच आहे. मग ते सकाळच्या किंवा संध्याकाळच्या हवेचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणे, फिरायला जाणे असो किंवा जॉगिंग…चालणं हे शरीरासाठी चांगलंच असते. परंतु दररोज चालायला जाण्याने खरोखर वजन कमी होते का? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येत असतो त्यामुळे आज आपण या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.
• दरदिवशी आपल्याला व्यायाम करण्यास मिळत नसेल तर तुमच्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम ठरू शकतो.
• चालण्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर एक चांगला प्रभाव पडतो.
• तज्ज्ञांच्या मते, चालण्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचे आजार कमी होतात. जर तुम्ही अति वजन आणि मधुमेहामुळे त्रस्त असाल तर त्या त्रासावर मात करण्यासाठी हा पर्याय योग्य आहे. यासाठी कधी आणि किती काळ चालत रहावे हे माहित असणे आवश्यक आहे.
• आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ३० मिनिटे चालावे. यामुळे आजारापासून दूर राहण्यास मदत होते.
• चालून कॅलरी बर्न होतात. तसेच वाढते वजन नियंत्रित राहू शकते.
• जेवणानंतर १० मिनिटे चालण्यामुळे टाईप -२ मधुमेहामध्ये बराच आराम मिळतो असे एका संशोधनात आढळून आले आहे.
• आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम करावा.