संजीव वेलणकर
देवराई, दोघी, दहावी फ, वास्तूपुरूष अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं.
सुमित्रा भावे यांच्या कारकीर्दीचा आढावा घेत वाहिलेली शब्दांजली:
जन्म. १२ जानेवारी १९४३ पुणे येथे.
सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. त्या मुळच्या पुण्याच्या. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदन ही केले. १९६५ साला पर्यत त्या टाटा इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्यांनी १९८५ पर्यत सोशल वर्क फिल्डमध्ये काम केले होते. त्यात दहा वर्षे पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन, अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प- प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्रीं यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या ईर्षेतुन त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या.
सुप्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले. चाकोरीबाहेरचे विषय हाताळून त्यांनी चित्रपट निर्माण केले.दहावी फ,दोघी, देवराई या दर्जेदार कलाकृती त्यांच्या कलेची साक्ष देतात.त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील एक प्रयोगशील कलावंत हरपली.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/LaqYUA9X1E
— Supriya Sule (@supriya_sule) April 19, 2021
सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नव्हत्या. त्यांचा पिंड समाजसेविकेचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिक्षणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनिल सुकथनकर त्यांना सहकारी म्हणुन लाभला. त्यांचा बाई हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दोन व्यक्तीमत्वांचे कार्यक्षेत्र भिन्न होते,परंतु ध्येय एकच होते, ते म्हणजे सामाजिक जागृती. योगायोगाने ते एकत्र आले. समांतर चित्रपट आजपर्यंत सरंजामशाही, शोषण, अत्याचार, विवाहबाह्य संबंध या पलिकडे गेला नव्हता. या दिग्दर्शक द्वयीने ‘ दोघी’, ‘वास्तूपुरूष’ यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दुरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले.
ज़िन्दगी ज़िन्दाबाद, भैंस बराबर, नितळ, घो मला असला हवा…
तुमचं सिनेमॅटिक जिनीएस अनुभवायला मिळालेल्यां पैकी मी एक भाग्यवान. तुमचा चित्रपट पाहून, भारावून, तुम्हाला फोन केला आणि तेव्हा आपल्या झालेल्या गप्पा मी ह्रदयात जपल्या आहेत.#SumitraBhave 🙏🏼🌹— Neena Kulkarni नीना कुळकर्णी (@neenakulkarni) April 19, 2021
जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु,दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, तसेच झी, स्क्रीन, म.टा. सन्मान आदी पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे स्वतंत्र कथा- पटकथा- संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनीच केले असुन संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कर्नाटकातील शाश्वटती या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा कामधेनु पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मुल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला होता.
ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन झाले. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई अशा दर्जेदार चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/Yf0WSFxRCO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 19, 2021
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी यांच्या चित्रपटातुन मानवी मन, नाते संबंध आणि समाज मन यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एम.के.सी.एल. या संस्थेसाठी ‘माझी शाळा’ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणारी दुरदर्शन मालिका निर्माण केली होती. मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. त्यांना केरळ मधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी – बलराज सहानी प्रतिष्ठान तर्फे दिला गेलेला के.ए.अब्बास स्मृती पुरस्कार मिळाले होते’.
सुमित्रा मावशी…सुमित्रा भावे गेल्या..
१० वी फ पासून दिठी पर्यंत सगळ्याच चित्रपटात आणि लघुपटात सुद्धा एक वेगळी सौंदर्यदृष्टी असणारी व्यक्ती.
शांत , संयत पण ठोस विचार असणाऱ्या अशा संवेदनशील व्यक्तीचं जाणं हे फार फार अस्वस्थ करणारं आहे.🙏🙏😪😪 @soumitrapote @sumrag @amitphalke pic.twitter.com/JGMv8uAs5i— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) April 19, 2021
सुमित्रा भावे नेहमी म्हणत असत माझा सिनेमा गल्ला भरण्यासाठी कधीच नव्हता आणि भविष्यातही नसेल. त्याचे दुःखही मला वाटत नाही. या सिनेमांसाठी प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी व्हावी, असेही कधी वाटले नाही. मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भाव-भावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो. सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Renowned filmmaker #SumitraBhave passes away. Film fraternity loses a gem!https://t.co/1rqkHgbzQu pic.twitter.com/r0O1vQZw0s
— Swati Shinde (@SwatiShindeTOI) April 19, 2021
(संजीव वेलणकर हे पुण्यातील ख्यातनाम कॅटरिंग व्यावसायिक आहेत. ते विविध विषयांवर सातत्याने लेखन करतात. हा व इतर लेख त्यांच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध आहेत.)
संपर्क ९४२२३०१७३३ ट्विटर @velsons