मुक्तपीठ टीम
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारे अनेक संघ आहेत, मुंबई इंडियन्स आणि चैनई सुपरकिंग्स पाठोपाठ आता कोलकता नाईट रायडर्स या संघाचा यात समावेश झाला आहे. रविवारी पार पडलेल्या या हंगामात केकेआरने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत स्पर्धेला चांगली सुरुवात केली. विजयानंतर संघाचा सह-मालक शाहरुख खान यांनी एक ट्विट करत संघाच्या शानदार सुरुवातीबद्दल अभिनंदन केले. शाहरुख खानने आपल्या ट्वीटमध्ये ८ खेळाडूंचा उल्लेख केला, परंतु आश्चर्याची बाब अशी की या आठ खेळाडूमध्ये संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनचा कुठेच उल्लेख करण्यात आलेला नाही.
केकेआरकडून पहिला सामना खेळणार्या हरभजन सिंगला अवघ्या एका षटकात गोलंदाजीची संधी मिळाली. शाहरुखानने ट्विटमध्येही त्याचा उल्लेख केला. शाहरुखने ट्विटमध्ये केकेआर टीमचे अभिनंदन करताना लिहिले की, ‘आयपीएलमध्ये १०० वा विजय नोंदविणे चांगली कामगिरी आहे. वेलडंन बॉईज … केकेआर, नितीश राणा, दिनेश कार्तिक, प्रसिद्ध कृष्णा, राहुल, आंद्रे रसेल, हरभजन सिंग (त्यांना थोडी गोलंदाजी करताना पाहून आनंद झाला.), साकिब अल हसन आणि पॅट कमिन्स, खरं सांगू तर सर्वांना खेळताना पाहून आनंद झाला.’
Good to hav our 100th IPL match win. Well done boys…@KKRiders @prasidh43 @DineshKarthik @NitishRana_27 #Rahul @Russell12A @harbhajan_singh ( good to see u even if briefly )@Sah75official @patcummins30 actually all were so good to watch.
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 11, 2021
केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याबद्दल
- केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला.
- या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ६ बाद १८७ धावा केल्या.
- नितीशशिवाय राहुल त्रिपाठीने शानदार फलंदाजी करत २९ चेंडूंत ५३ धावा आणि दिनेश कार्तिकने ९ चेंडूंत नाबाद २२ धावा केल्या.
- प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघाला २० षटकांत पाच बाद १७७ धावांचा टप्पा पार करताना आला.
- मनीष पांडेने ४४ चेंडूत ६१ धावा करून नाबाद परतला.
- मनीष पांडेने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, परंतु संघ जिंकू शकला नाही.
- या विजयासह केकेआर पॉईंट टेबलमध्ये दुसर्या स्थानावर पोहोचला, तर दिल्ली कॅपिटल्स सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.