मुक्तपीठ टीम
आज म्हणजेच १ एप्रिल २०२१ पासून देशातील अनेक बँकांची जुनी व्यवस्था बदलत आहे. १ एप्रिल २०२१ पासून, जुने चेकबुक, पासबुक आणि इंडियन फायनान्शियल सर्विस कोड (आयएफएससी कोड) बदलले गेले आहेत. आता पूर्वीचे चालणार नाहीत. आपले खाते या सार्वजनिक बँकांमध्ये असेल तर चेक बुकसह इतर नवी माहिती मिळवली नसेल तर त्वरित मिळवा.
कोणत्या बँकांमध्ये झाला बदल?
• देना बँक
• विजया बँक
• ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
• युनायटेड बँक ऑफ इंडिया सिंडिकेट बँक
• आंध्र बँक
• कॉर्पोरेशन बँक
• अलाहाबाद बँक
या बँकमध्ये असेल तर या बँकांच्या विलीनीकरणानंतर, त्यांची जुनी चेकबुक यापुढे चालणार नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे या अशा बँका आहेत ज्यांचे अन्य बँकांमध्ये विलीनीकरण १ एप्रिल २०१९ आणि १ एप्रिल २०२० पासून अंमलात आले आहे. या पर्यायानंतर या बँकांची सर्व कागदपत्रे निरुपयोगी ठरतील. अशा परिस्थितीत आपण पासबुक आणि चेकबुक वेळेत अपडेट केल्यास आपण कोणत्याही प्रकारच्या अडचणीपासून वाचाल.
केंद्र सरकारने बर्याच बँका दुसऱ्या बँकांमध्ये विलीन केल्या आहेत. अशा परिस्थितीत विलीनीकृत बँकांचे चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड सर्व बदलले आहेत. त्यामुळे जुने चेकबुक, पासबुक आणि आयएफसीए कोड यापुढे काम करणार नाहीत.
कोणत्या बँकांचे विलीनीकरण?
• देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले
• सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली
• आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली
• ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण केले
• अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली
या बँकांच्या ग्राहकांना दिलासा
या विलीनीकरणामुळे सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँकेच्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांची चेकबुक ३० जून २०२१ पर्यंत वैध असेल. यानंतर सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे लागेल. याशिवाय ज्या बँकांचे विलीनीकरण केले जात आहे त्यांना ३१ मार्चपासून नवीन चेकबुक मिळत आहेत.