Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उंची तीन फुटांची…सर केली उंची वकिलीच्या करिअरची!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
harvindar

मुक्तपीठ टीम

 

गुणांपेक्षा रंग-रुप-शरीरावर माणसाला जोखायचं नसतं. पण अनेकदा घडतं तसंच. त्यातून मग तसे करणाऱ्यांचेच हसे होते. आणि कर्तृत्वाच्या बळावर ज्यांची अवहेलना केली जाते ते आभाळाएवढी उंची गाठतात. अॅड हरविंदर कौर उर्फ रुबी अशांपैकीच एक कर्तृत्वान.

 

हरविंदर कौर उर्फ रुबी भटिंडा जवळील रामा मंडीची रहिवासी आहे. हरविंदरची उंची ३ फूट ११ इंच आहे. रुबीला तिच्या छोट्या उंचीमुळे अनेक जणांचे बोलणे ऐकावे लागत असे. बालपणी तिला लोकांचे टोमणे तसेच खूप काही सहन करावे लागले. परंतु, आज तिची ही छोटी उंची लोकांमध्ये चांगल्या चर्चेचा विषय ठरली आहे. यातून लोकांना प्रेरणा देखील मिळतेय. कारण परंतु तिने हार मानली नाही. आज ती भारतातील सर्वात कमी उंची असलेली वकील आहे. ती पंजाबच्या जालंधर न्यायालयात वकिली करते.

 

अ‍ॅडव्होकेट हरविंदर कौरला लहानपणापासूनच एअर होस्टेस व्हायचे होते. पण उंचीमुळे तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यावेळी, तिच्या कुटुंबीयांनीही डॉक्टरांना दाखवले. तिची वाढ कमी होती. ज्यासाठी, औषध देखील अनेक वेळा दिले गेले. मग हरविंदरने एअर होस्टेस होण्याचे स्वप्न सोडून दिले आणि तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. तिने बारावीनंतर सोशल मीडियाचा आधार घेतला. तिने मोटिव्हेशनल व्हिडीओ पाहिले. यामुळे तिला धैर्य प्राप्त झाले. तेव्हा तिने असा दृढ निश्चय केला की, देवाने तिला जसे बनवले आहे ते स्वीकारायचे.

 

सोशल मीडियावरील लोकांनीही तिला खूप प्रेम दिले. तिने आपली कहाणी लोकांना सांगायला सुरुवात केली. ती सोशल मीडियावरून हे शिकली की, ज्यांना दुर्लक्ष करायचे आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, जे चाहते आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. अनेकजण तिची नेहमी चेष्टा करायचे, एक वेळ अशी होती जेव्हा ती लोकांपासून दूर होती. बर्‍याच वेळा तिच्या मनात आत्महत्या करणारे विचारही आले. पण तिने स्वत:ला सावरले.

 

कॉलेजला गेल्यानंतर तिचे आयुष्य खूप बदलले. ती हळू हळू सकारात्मक विचार करू लागली. त्यानंतर बारावीनंतर तिने कायद्याच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे अभ्यास पूर्ण केला. आता ती अ‍ॅडव्होकेट बनली आहे, पुढे तिचे न्यायाधीश होण्याचे स्वप्न आहे. ती एक मोटिव्हेशनल स्पीकर म्हणजेच प्रेरणादायी वक्तासुद्धा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: अॅड हरविंदर कौरपंजाब जालंधर न्यायालयवकिलसोशल मीडिया
Previous Post

एक पोलीस अधिकारी असा…ज्याचा अभिमान बाळगावा!

Next Post

‘या’ बँकांचे ग्राहक असाल तर आजपासून सारंच बदललं! नक्की वाचा ही बातमी…

Next Post
dena bank

'या' बँकांचे ग्राहक असाल तर आजपासून सारंच बदललं! नक्की वाचा ही बातमी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!