Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पावणे पाच लाख मुंबईकरांनी अद्याप घेतला नाही कोरोना लसीचा दुसरा डोस! अफवांचा संसर्ग करतोय घात

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
2nd dose of vaccine

मुक्तपीठ टीम

देशभरासह मुंबईत कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला १० महिने पूर्ण झाले आहेत. देशात लसीकरण मोहिमेचा वेग गेल्या महिन्याभरापासून मंदवला आहे. लसींचा पुरेसा साठा असूनही, असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये दुसऱ्या डोसबाबत संभ्रम आहे. पहिल्या डोसनंतर, बरेच लोक दुसरा डोस आवश्यक मानत नाहीत. आता पर्यंत पावणे पाच लाख लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला नाही आहे. विविध अफवांमुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. प्रशासन अनेक दिवसांपासून या अफवांपासून लोकांना जागरूक करत आहे, तरीही काही लोक संभ्रमात आहेत.

 

कोरोना लसीबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे अनेक लोक लस घेण्यास नकार देत आहेत. यामध्ये सुशिक्षित लोकांचाही समावेश आहे. लस न घेण्याबाबतही त्यांचे अनेक तर्कवितर्क आहेत.सोशल मीडियावर लसीच्या दुष्परिणामांच्या अनेक बातम्या येत आहेत. देश-विदेशात लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना झाल्याच्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत, मग लस घेऊन काय उपयोग? लस घेतल्याची दुसरी अफवा म्हणजे नपुंसकत्व. लस घेतल्याने अनेकांनी नपुंसकत्व आल्याचा दावा केला आहे. अनेक निरक्षर आणि धार्मिक लोकांनीही लस घेण्यास नकार दिला आहे.

 

मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मनपा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की लोकं दुसरा डोस का घेत नाही आहेत. केंद्रातील डॉक्टर लसीबाबत लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत आहेत. एवढेच नाही तर ज्यांचा दुसरा डोस चुकला आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त केले जात आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या नगण्य आहे.

 

पावणे पाच लाख लोकांनी घेतला नाही लसीचा दुसरा डोस

काकाणी म्हणाले की, एकट्या मुंबईत सुमारे पावणे पाच लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. आतापर्यंत झालेल्या संपर्कांपैकी १० हजार लाभार्थ्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आले आहे.

 

लस घेण्याने कोरोनापासून ९० टक्के संरक्षण!

  • कोरोना लस ही एक रोगप्रतिकारशक्तीवर्धक आहे. जी संसर्गासोबतच तुमची व्हायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते.
  • त्याचे अनेक फायदे आहेत.
  • १४ दिवसांच्या डोसमध्ये ते तुमच्या शरीरावर पूर्ण प्रभाव दाखवते.
  • दुसरा डोस घेतल्यास ९० टक्क्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो.

Tags: corona vaccinemumbaiMunicipal Corporationsuresh kakaniकोरोना लसमनपामुंबईसुरेश काकाणी
Previous Post

स्टेट बँकेची जनधन गरीब खातेधारकांकडून १६४ कोटींची लूट

Next Post

हल्लेखोर विमानांचा पाठलाग करत पाकिस्तानात धडकण्याचा महापराक्रम! अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र!!

Next Post
अभिनंदन

हल्लेखोर विमानांचा पाठलाग करत पाकिस्तानात धडकण्याचा महापराक्रम! अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!