Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हल्लेखोर विमानांचा पाठलाग करत पाकिस्तानात धडकण्याचा महापराक्रम! अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
अभिनंदन

मुक्तपीठ टीम

आपल्या अद्भूत धैर्याने पाकिस्तानचे लढाऊ विमान उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांच्या शौर्याबद्दल आज सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन यांना वीर चक्र देऊन सन्मानित केले. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान त्यांनी पाडून उद्ध्वस्त केले होते.

 

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर अभिनंदन वर्धमान यांनी हवाई संघर्षात एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले. त्यांचे धाडस पाहता यावर्षी ३ नोव्हेंबरला त्यांना प्रमोशनही देण्यात आले. त्यांच्याकडे ग्रुप कॅप्टनची जबाबदारी देण्यात आली होती. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ विमानात असताना एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले होते.

 

अभिनंदन यांची अभिमानास्पद कामगिरी बनले देशाचे रिअल हिरो

  • मिग-२१ सारख्या जुन्या विमानातून स्वार होऊनही अभिनंदन यांनी पाकिस्तानचे आधुनिक लढाऊ विमान एफ-१६ ला पाडले होते.
  • त्यानंतर त्यांच्या या कामगिरीमुळे ते देशाचे नायक म्हणून समोर आले.
  • या युद्धादरम्यान ते पाकिस्तानात पडले होते. त्यानंतर त्यांना तेथे अटक करण्यात आली.
  • यानंतर भारताने राजनैतिक दबाव टाकून दुसऱ्याच दिवशी त्यांना पाकिस्तानातून आणले.
  • संपूर्ण देश त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करत होता. वाघा बॉर्डरवर त्यांची सुटका करण्यात आली.

 

ही घटना घडली तेव्हा अभिनंदन वर्धमान श्रीनगरच्या ५१ स्क्वॉड्रनचा भाग होते. २६ फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

 

वीर चक्र का देण्याचे मूळ कारण

  • युद्धाच्या वेळी अप्रतिम शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना वीर सन्मान चक्र दिले जाते.
  • हा देशाचा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.
  • हे चक्र मरणा नंतरही दिले जाते. शौर्यामध्ये, ते महावीर चक्र नंतर दिले जाते.
  • जिवाची पर्वा न करता शत्रूंविरुद्ध लढणाऱ्या शूर सैनिक आणि सैनिकांना हे पदक दिले जाते.
  • हे पदक चांदीचे आहे. निळ्या आणि केशरी रंगाच्या फितीसोबत ते दिले जाते.

Tags: Abhinandan Vardhman honoredIndiamuktpeethPakistanPresident Ramnath KovindVeer Chakraअभिनंदन वर्धमानपाकिस्तानभारतमहापराक्रममुक्तपीठराष्ट्रपती रामनाथ कोविंदवीर चक्र
Previous Post

पावणे पाच लाख मुंबईकरांनी अद्याप घेतला नाही कोरोना लसीचा दुसरा डोस! अफवांचा संसर्ग करतोय घात

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम, फिजिओथेरपी सुरू

Next Post
uddhav thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम, फिजिओथेरपी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!