Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टेट बँकेची जनधन गरीब खातेधारकांकडून १६४ कोटींची लूट

मुंबई आयआयटीच्या अहवालात गौप्यस्फोट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SBI and Jandhan

मुक्तपीठ टीम 

स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१७ ते २०१९ या काळात एका महिन्यात चारपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांसाठी प्रत्येक वेळी १७.७० रुपये आकारले असल्याचे समोर आले आहे. असं पाहिलं तर आकडा खूप छोटा वाटतो. पण यामार्गाने देशातील सर्वात मोठ्या बँकेने गरीब खातेधारकांकडून १६४ कोटी लुटले आहेत. सर्वसामान्यांना बँकिंग सुविधेशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरु करण्यात आली होती. परंतु हेच खातेधारक स्टेट बँकेकडून ट्रांझेक्शन शुल्काच्या नावाखाली लुटले गेले आहेत.

आयआयटी मुंबईच्या अहवालात ही लूट उघड झाली आहे. शुल्क आकारताना बँकेने जन धन खात्यांशी जोडलेल्या अटीचे उल्लंघन केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, तसे करून स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेचे नियमही मोडले आहेत. या नियमांनुसार, खात्याशी नवीन सेवा जोडण्यासाठी आकारले जाणारे शुल्क वाजवी ठेवण्यास सांगितले आहे.

आयआयटीच्या अहवालात उघड झाली लूट

  • अहवालानुसार, सुरुवातीला जन धन खातेधारकांना एका महिन्यात ४ पेक्षा जास्त ट्रांझेक्शन करण्याची परवानगी नव्हती.
  • नियम बदलून, स्टेट बँकेने इतर बँकांप्रमाणे चारपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांना परवानगी दिली.
  • परंतु, प्रत्येक व्यवहारावर १७.७० रुपये आकारले जाऊ लागले. म्हणजेच, जर जन धन खातेधारक एका महिन्यात चार व्यवहारांनंतर UPI वरून १५ रुपयांची खरेदी केल्यास , तर त्याच्या खात्यातून १७.७० रुपये कापले जाऊ लागले .

 

९० कोटी परत आले, पण व्याज बाकी!

  • जेव्हा सरकारने UPI पेमेंट्स शुल्कमुक्त केले, तेव्हा असे आढळून आले की १ जानेवारी २०२० ते ६ एप्रिल २०२० आणि १ जुलै २०२० ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान स्टेट बँकेत २२२ कोटी UPI व्यवहार झाले.
  • त्यापैकी ५ कोटी १० लाख ट्रांझेक्शन्सवर प्रति ट्रांझेक्शन १७ रुपये २० पैसे आकारले गेले.
  • अशा प्रकारे बँकेने या कालावधीत अशा ट्रांझेक्शन्ससाठी ९० कोटींहून अधिक रुपये कापले.
  • बँकेने फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये हे पैसे परत केले, परंतु खातेदारांना या रकमेवर सुमारे २.१ कोटी रुपये व्याजाचे नुकसान झाले.
  • आयआयटीच्या अहवालानुसार, बँकेकडे असलेल्या या रकमेवर जनधन खातेधारकांचाही हक्क आहे.
  • झीरो बॅलन्स सुविधा असूनही, मार्च २०२० अखेरपर्यंत जन धन खात्यातील सरासरी शिल्लक २४५७ रुपयांनी जास्त आहे.

 

जनधन खातेधारक गरीबांशी भेदभाव

  • आयआयटीच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, स्टेट बँकेने गरिबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याच्या पंतप्रधानांच्या योजनेच्या लाभार्थ्यांशी भेदभाव केला आहे.
  • ऑगस्ट २०२०मध्ये याविरोधात अर्थ मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली होती.
  • त्यानंतर, CBDT ने ३० ऑगस्ट २०२० रोजी बँकांना १ जानेवारी २०२० पासून खातेदारांकडून आकारले जाणारे शुल्क परत करण्यासाठी परिपत्रक जारी केले.
  • स्टेट बँकने १७ फेब्रुवारी २०२१ रोजी रक्कम परत करण्यास सुरुवात केली, परंतु अद्याप १६४ कोटी परत करणे बाकी आहे.

Tags: mumbai iitPradhan Mantri Jan Dhan YojanaState Bank of IndiaTransaction chargeट्रांझेक्शन शुल्कप्रधानमंत्री जन धन योजनामुंबई आयआयटीस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीचं हनीट्रॅप रॅकेट, ग्रामीण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची वसुली!

Next Post

पावणे पाच लाख मुंबईकरांनी अद्याप घेतला नाही कोरोना लसीचा दुसरा डोस! अफवांचा संसर्ग करतोय घात

Next Post
2nd dose of vaccine

पावणे पाच लाख मुंबईकरांनी अद्याप घेतला नाही कोरोना लसीचा दुसरा डोस! अफवांचा संसर्ग करतोय घात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!