मुक्तपीठ टीम
देशभरासह मुंबईत कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला १० महिने पूर्ण झाले आहेत. देशात लसीकरण मोहिमेचा वेग गेल्या महिन्याभरापासून मंदवला आहे. लसींचा पुरेसा साठा असूनही, असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये दुसऱ्या डोसबाबत संभ्रम आहे. पहिल्या डोसनंतर, बरेच लोक दुसरा डोस आवश्यक मानत नाहीत. आता पर्यंत पावणे पाच लाख लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला नाही आहे. विविध अफवांमुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. प्रशासन अनेक दिवसांपासून या अफवांपासून लोकांना जागरूक करत आहे, तरीही काही लोक संभ्रमात आहेत.
कोरोना लसीबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे अनेक लोक लस घेण्यास नकार देत आहेत. यामध्ये सुशिक्षित लोकांचाही समावेश आहे. लस न घेण्याबाबतही त्यांचे अनेक तर्कवितर्क आहेत.सोशल मीडियावर लसीच्या दुष्परिणामांच्या अनेक बातम्या येत आहेत. देश-विदेशात लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना झाल्याच्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत, मग लस घेऊन काय उपयोग? लस घेतल्याची दुसरी अफवा म्हणजे नपुंसकत्व. लस घेतल्याने अनेकांनी नपुंसकत्व आल्याचा दावा केला आहे. अनेक निरक्षर आणि धार्मिक लोकांनीही लस घेण्यास नकार दिला आहे.
मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मनपा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की लोकं दुसरा डोस का घेत नाही आहेत. केंद्रातील डॉक्टर लसीबाबत लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत आहेत. एवढेच नाही तर ज्यांचा दुसरा डोस चुकला आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त केले जात आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या नगण्य आहे.
पावणे पाच लाख लोकांनी घेतला नाही लसीचा दुसरा डोस
काकाणी म्हणाले की, एकट्या मुंबईत सुमारे पावणे पाच लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. आतापर्यंत झालेल्या संपर्कांपैकी १० हजार लाभार्थ्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आले आहे.
लस घेण्याने कोरोनापासून ९० टक्के संरक्षण!
- कोरोना लस ही एक रोगप्रतिकारशक्तीवर्धक आहे. जी संसर्गासोबतच तुमची व्हायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते.
- त्याचे अनेक फायदे आहेत.
- १४ दिवसांच्या डोसमध्ये ते तुमच्या शरीरावर पूर्ण प्रभाव दाखवते.
- दुसरा डोस घेतल्यास ९० टक्क्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो.