Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘झोमॅटो’च्या व्यवसायाची चव बिघडतेय? मोठे सोडून गेल्यानंतर आता कर्मचारी कपातीचा धोका…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
'Zomato

मुक्तपीठ टीम 

कोरोना महामारीनंतर आता अनेक देशांमध्ये आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यात भारतही आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ज्याप्रमाणे फेसबुक मेटा आणि ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे त्याचप्रमाणे, जगभरातील आयटी कंपन्यांसह, इतर क्षेत्रातील कंपन्यांही या विचारात असल्याचे समोर येत आहे. आता ऑनलाइन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो बाबतही अशी माहिती मिळत आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर कंपनी ३ ते ४ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार असल्याची बातमी आहे.

संस्थापक गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर, कर्मचारी कपातीचा धोका!

  • झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी १८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
  • गुप्ता साडेचार वर्षांपूर्वी झोमॅटोमध्ये सामील झाले.
  • त्यांना २०२०मध्ये कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सह-संस्थापक म्हणून पदोन्नती देण्यात आली.
  • राजीनामा दिल्यानंतर गुप्ता यांनी म्हटलं आहे की, जीवनातील इतर क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी झोमॅटोमधून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
  • झोमॅटोने सांगितले की गुप्ता यांना कंपनी कायदा, २०१३ आणि सूची नियमांनुसार मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून नियुक्त केले गेले नाही.

झोमॅटोमधील मॅनेजमेंटमध्ये काम करणारे बडे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजीनामे देत आहेत. ही संख्या वाढत आहे. सहसंस्थापक मोहित गुप्ता यांच्या राजीनाम्यापूर्वीच अनेक अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. गुप्ता यांचा राजीनामा हा कंपनीचा तिसरा मोठा राजीनामा असल्याचे बोलले जात आहे.

झोमॅटो कर्मचारी कपात करण्याची शक्यता

  • झोमॅटोमध्ये ३ ते ४ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते.
  • सध्या झोमॅटोमध्ये ३ हजार ८०० कर्मचारी काम करत आहेत.
  • २०२०मध्ये झोमॅटोमध्येही टाळेबंदी करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात कंपनीने ५२० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
  • त्यावेळी व्यवसायातील मंदीमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Tags: Financial CrisismuktpeethZomatoZomato Ex-Co-Founder Mohit GuptaZomato layoffsआर्थिक संकटघडलं-बिघडलंझोमॅटोझोमॅटो कर्मचारी कपातझोमॅटो माजी सह-संस्थापक मोहित गुप्तामुक्तपीठ
Previous Post

एअर इंडिया विमानांमध्ये आता ‘टाटा टच’! इकॉनॉमी क्लासमध्येही जास्त सुविधा…

Next Post

#RIPTwitter ट्विटर बंद होण्याबद्दल एलॉन मस्क काय म्हणाले?

Next Post
Twitter

#RIPTwitter ट्विटर बंद होण्याबद्दल एलॉन मस्क काय म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!