मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आलेले एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. चार ते पाच एनएसजी कमांडोसह एकूण २२ सुरक्षा रक्षक झेड श्रेणीच्या सुरक्षेत तैनात असतात.
झेड श्रेणीच्या सुरक्षेत २२ रक्षक तैनात
- चार ते पाच एनएसजी कमांडोसह एकूण २२ सुरक्षा रक्षक झेड श्रेणीच्या सुरक्षेत तैनात आहेत.
- यामध्ये दिल्ली पोलिस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे कमांडो आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे.
माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी
- तर, हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे.
- १९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
- आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही.
- मला हे आवडतही नाही.
- माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे.
- मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही.
- जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन.
संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद
- एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता गोळीबार झाला.
- त्यांचा ताफा दिल्ली परताना ही घटना घडली.
- दोन तरुणांनी कारच्या खाली गोळीबार केला.
- यावेळी समर्थकांनी हल्लेखोरांपैकी एकाला पकडून टोल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
- त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दुसऱ्यालाही पकडले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
भाषणाचा राग आल्याने केला हल्ला
- पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सचिन आणि शुभम अशी आहेत.
- ओवेसींच्या द्वेषपूर्ण भाषणाचा मला राग आला होता, म्हणून त्यांनी हा हल्ला केल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले.
- चौकशीत सचिनने सांगितले की, शुभमसोबत त्याची मैत्री फेसबुकवर झाली होती.
- त्यानंतर फोनवर बोलणे सुरू झाले.
- फोनवरच हल्ल्याची योजना आखली.
- मित्रांकडून पिस्तुल घेतली.
- हल्ल्यापूर्वी दोघे भेटले आणि कारने टोल प्लाझा गाठले.