मुक्तपीठ टीम
सध्या जगभर ई-वाहनांटा वापर वाढतोय. आपला देश आणि राज्यही त्याला अपवाद नाही. मुंबईतील बीकेसी या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये सुरु असलेली युलू ई-बाइक सेवा चांगलीच यशस्वी ठरलीय. आता लवकरच ती सेवा मुंबईभर विस्तारण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी किमान ५०० चार्जिंग बॅटरी स्वपिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.
बदलत्या काळानुसार प्रदूषणमुक्त जगाचं महत्व पटत असल्यानं अधिकाधिक लोकांना आता ई-वाहनं भावतात. त्यानुसार ते आपलं वाहन किंवा प्रवासाची पद्धत बदलतात. लोकांना या नव्या बदलास तयार करण्याचे काम युलु ई-बाईकसारखे स्टार्टअप करत आहेत. ही ई बाइक सेवा सध्या मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीत चांगला सुरु आहे. वर्षभरापासून सुरू असलेली ही ई-बाईक सेवा बीकेसी केंद्राच्या वातावरणात एक लाख किलो कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यात यशस्वी ठरली आहे. मुंबईभर ही सेवा सुरु झाली तर स्वस्त आणि मस्त प्रदूषणरहित वाहतूक सेवेचा पर्याय मुंबईकरांना लाभेल.
मुंबईभर ५०० चार्जिंग बॅटरी स्वपिंग स्टेशन्स उभारणार!
- यूलू ई-बाइक आता येत्या काही महिन्यांत आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे.
- त्यासाठी मुंबईभर बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उभारली जातील.
- त्यातील पहिली ५०० पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये असतील.
- पुढच्या टप्प्यात मुंबईसह अशी स्टेशन्स उभारली जातील.
- त्यानंतर देशभरात ई-बाइक्सचा ताफा वाढवण्याची योजना आहे.
अदाणी इलेक्ट्रिकसोबत युलूची बॅटरी स्टेशन्स
- पुढील १८ महिन्यांत अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) च्या मदतीने ५०० बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारले जातील.
- ही स्टेशन्स जे ई-बाइक्सला वीजपुरवठा करतील.
- तसेच Yulu उत्पादित बॅटरीऐवजी पूर्णपणे चार्ज केलेली बॅटरी बदलली जाईल.
युलु बाइक चालवताना कमी बॅटरी दिसल्यास, ते जवळच्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशन किंवा यूलू पार्किंगमध्ये गाडी सोडू शकतात.