Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किल्ले सिंहगड, प्रदूषणमुक्त ‘हरित’ पर्यटन विकास! ई-वाहनं धावणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
sinhgad

मुक्तपीठ टीम

नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमानं इतिहासात अजरामर झालेला किल्ला सिंहगड. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द पाळत किल्ला सर करण्यासाठी त्यांनी प्राणांचीही आहुती दिली. एकीकडे अभिमान बाळगावा असा पराक्रमी वारसा तर दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची उधळण. त्यामुळे स्वाभाविकच हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. मात्र, त्याला साजेशा सोयी सुविधा मात्र तिथं नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहगड किल्ला व पर्यटन विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर ईलेक्ट्रिक वाहनांसह अन्य सुविधा पुरवण्याच्या दिशेने कामाला सुरुवातही झाली आहे.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहगड किल्ला व पर्यटन विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून येथे विविध सोयीसुविधा करणे आवश्यक आहे. pic.twitter.com/y7xkh2Mdm5

— Supriya Sule (@supriya_sule) September 17, 2021

 

हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून येथे विविध सोयीसुविधा करणे आवश्यक असण्यावर चर्चा झाली. त्यानंतर वन विभागाच्यावतीनं तिथं ईलेक्ट्रिक वाहन सुरू करण्याची योजना आखली आहे. एका ठराविक टप्प्यानंतर खासगी वाहनांना प्रवेश नाकारुन ईलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास करावा लागेल. त्यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषण राखता येईल. १५ ई-बसेस चालवण्यासाठी पीएमपीएमएल सोबत करार करणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.

 

पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी नुकतीच किल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी गावातील स्थानिकांसोबत संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.

 

सिंहगड किल्ला pic.twitter.com/Gm1iYTgPGE

— रानवाटाड्या (@Abhi_Thosar) January 3, 2021

 

काय ठरलं गावातील बैठकीत?

  • त्यांनी बारावी झालेल्या ३० स्थानिक तरूणांची निवड केली आहे, जे गडावर मार्गदर्शक म्हणून काम करतील.
  • आणि या ३० तरूणांना २ इतिहासकार किल्याच्या इतिहासाचे प्रशिक्षण देतील.
  • १५ ई-बसेस चालवण्यासाठी पीएमपीएमएल सोबत करार करणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
  • गडावरील प्लास्टिक बंदीवर वन अधिकारी काम करत आहेत असेही पाटील यांनी सांगितले.
  • सिंहगड येथील वनविभागाच्या मार्गदर्शकांनी ई-वाहनांची योजना केली आहे.
  • ठराविक ठिकाणी खाद्यपदार्थांची दुकाने, ३० मार्गदर्शकांचे पथक निर्माण करणे आणि ई-वाहने चालवणे असे काही महत्वाचे बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • वनविभागाच्या पुणे विभागाने किल्यावर सुव्यवस्था करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarpollution free tourism developmentpunesinhgad areaउपमुख्यमंत्री अजित पवारनरवीर तानाजी मालुसरेराहुल पाटीलसिंहगड
Previous Post

राज्यात ३,३२० नवे रुग्ण, ४,०५० रुग्ण बरे! मुंबईसह कोकणात रुग्णवाढ!!

Next Post

युलू ई-बाइकमुळे बीकेसीत एक लाख किलो कार्बन प्रदूषण टळलं, आता सेवा मुंबईभर विस्तारणार!

Next Post
yulu

युलू ई-बाइकमुळे बीकेसीत एक लाख किलो कार्बन प्रदूषण टळलं, आता सेवा मुंबईभर विस्तारणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!