मुक्तपीठ टीम
भारतात यूट्यूब क्रिएटर्सची संख्या सतत वाढताना दिसत आहे. यूट्यूबवर कला प्रदर्शित करण्यासाठी अधिकाधिक लोक कंटेंट क्रिएटर्स म्हणून करिअर प्लॅटफॉर्म शोधत आहेत. यूट्यूबने ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीचा अहवाल सादर केला आहे, ज्यातून हे दर्शविले जाते की, यूट्यूबचे क्रिएटर्स इकोसिस्टम प्रचंड आर्थिक मूल्य निर्माण करत आहे आणि सुमारे ६.८४ लाख लोकांना पूर्णवेळ नोकऱ्या देत आहे. २०२० मध्ये, त्याने भारतीय अर्थव्यवस्थेत ६ हजार ८०० कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले.
करिअर बनवण्याव्यतिरिक्त कमाईचा नवा मार्ग
- सध्या भारतातील १ लाखाहून अधिक सब्सक्राइबर्स असलेल्या चॅनेलची संख्या ४० हजरांपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी दर वर्षी ४५ टक्के वाढ नोंदवली आहे.
- यासह, यूट्यूब क्रिएटर्स या प्लॅटफॉर्मवर नवीन संधी आणि प्रेक्षक तसेच उत्पन्न मिळविण्याचे नवीन मार्ग उघडत आहेत.
- यूट्यूब प्लॅटफॉर्मवर चॅनेलची कमाई करण्याचे ८ वेगवेगळे मार्ग आहेत.
- दरवर्षी किमान १ लाख रुपये कमावणाऱ्या चॅनेलची संख्या ६० टक्क्यांनी वाढत आहे.
यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सचे जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटींचे योगदान
- व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या ‘क्रिएटर इकोसिस्टम’ने २०२० मध्ये देशांतर्गत अर्थव्यवस्थेत ६ हजार ८०० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
- स्वतंत्र सल्लागार कंपनी ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जारी केलेला अहवाल, भारतातील यूट्यूबच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावाचे मूल्यांकन करतो.
रोजगाराचे नवीन स्त्रोत
- ऑनलाइन संभाषणात निष्कर्ष जाहीर करताना, यूट्यूबने सांगितले की, “या अहवालात असे दिसून आले आहे की यूट्यूब इकोसिस्टमने भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय आर्थिक मूल्य निर्माण केले आहे.”
- यूट्यूबने २०२० मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
- देशात यूट्यूबचे ४४८ दशलक्ष यूजर्स आहेत.
- यूट्यूबने सांगितले की, उत्पन्नाचे हे स्रोत केवळ सर्जनशील उद्योजकांसाठी नोकऱ्या आणि उत्पन्नाचे समर्थन करत नाहीत तर पुरवठा साखळींमध्ये व्यापक क्रियाकलापांना प्रोत्साहन देखील देतात.