Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता? तरुण मतदारांचीही असणार महत्वाची भूमिका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
young voters

मुक्तपीठ टीम

निवडणूक आयोगाने शनिवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या पाच राज्यांमध्ये सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. १० फेब्रुवारी २०२२ रोजी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची सुरुवात होईल आणि ३ मार्च २०२२ रोजी उत्तर प्रदेशमध्ये ७ व्या टप्प्यासह समाप्त होईल. निवडणूक आयोगाने १० मार्च ही मतमोजणीची तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीत मताधिकार असलेल्या १८ कोटी ३४ लाख मतदारांमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या युवा मतदारांची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यांच्यातही पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी लाभलेला नवयुवा वर्ग २५ लाखापर्यंत आहे.

 

२५ लाख नवीन मतदार प्रथमच देणार मत!

  • या निवडणुकीत भाग घेणाऱ्या १८ कोटी ३४ लाख मतदारांमध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
  • १८ ते ३५ वयोगटातील या युवा मतदारांमध्ये किमान २४ लाख ९० हजार हे पहिल्यांदाच मत देण्याचा अधिकार लाभलेले नवयुवा आहेत.
  • पहिलेच मतदान असल्याने हा वर्ग उत्साहाने मतदान करण्यासाठी बाहेर येईल आणि इतरांनाही प्रेरित करेल, याची जास्त शक्यता आहे.
  • मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ५ राज्यांच्या मतदार यादीत २४.९ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ११.४ लाख नवतरुणी आहेत.
  •  सर्व पाच राज्यांमधील एकूण १८.३४ कोटी मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यामध्ये ८.५५ कोटी महिला मतदार आहेत.

 

निवडणूक आयुक्तांनी महिलांचे केले कौतुक

  • मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी निवडणुकीत महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले.
  • ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिलांनी चोखपणे मतदान केले आहे. ते देशात समानतेला चालना देत आहे.
  • निवडणुकीच्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक मतदान केंद्र असेल, ते महिला कर्मचारी चालवतील.
  • महिला मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

राज्यात होणाऱ्या निवडणुकांचे वेळापत्रक

सर्व राज्यांचे निकाल – १० मार्च

१. पहिला टप्पा उत्तर प्रदेश

  • अधिसूचना १४ जानेवारी
  • नामांकनाची अंतिम तारीख २१ जानेवारी
  • २४ जानेवारीला नामनिर्देशनपत्रांची पडताळणी
  • नामांकन २७ जानेवारी
  • १० फेब्रुवारीला मतदान

२. दुसरा टप्पा उत्तर प्रदेश आणि पहिला टप्पा पंजाब, उत्तराखंड, गोवा

  • अधिसूचना २१ जानेवारी
  • नामांकनाची अंतिम तारीख २८ जानेवारी
  • नामांकनांची पडताळणी २९ जानेवारी
  • नामांकन ३१ जानेवारी
  • १४ फेब्रुवारी रोजी मतदान

३. तिसरा टप्पा उत्तर प्रदेश

  • अधिसूचना २५ जानेवारी
  • नामांकनाची अंतिम तारीख १ फेब्रुवारी
  • नामनिर्देशनपत्रांची पडताळणी २ फेब्रुवारी
  • नामांकन ४ फेब्रुवारी
  • २० फेब्रुवारी रोजी मतदान

४. चौथा टप्पा उत्तर प्रदेश

  • अधिसूचना २७ जानेवारी
  • नामांकनाची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी
  • नामनिर्देशनपत्रांची पडताळणी ४ फेब्रुवारी
  • नामांकन ७ फेब्रुवारी
  • २३ फेब्रुवारीला मतदान

५. उत्तर प्रदेश पाचवा टप्पा आणि मणिपूर पहिला टप्पा

  • अधिसूचना १ फेब्रुवारी
  • नामांकनाची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी
  • नामनिर्देशनपत्रांची पडताळणी ९ फेब्रुवारी
  • नामांकन ११ फेब्रुवारी
  • २७ फेब्रुवारीला मतदान

 

६. उत्तर प्रदेश सहावा टप्पा आणि मणिपूर दुसरा टप्पा

  • अधिसूचना ४ फेब्रुवारी
  • नामांकनाची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी
  • १४ फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्रांची पडताळणी
  • नामांकन १६ फेब्रुवारी
  • ३ मार्च रोजी मतदान

 

७. उत्तर प्रदेश सातवा टप्पा

  • अधिसूचना १० फेब्रुवारी
  • नामांकनाची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी
  • नामनिर्देशनपत्रांची पडताळणी १८ फेब्रुवारी
  • नामांकन २१ फेब्रुवारी
  • ७ मार्चला मतदान

Tags: Assembly electionselection commissionFive statesGoamanipurpunjabUttar PradeshUttarakhandyoung votersउत्तर प्रदेशउत्तराखंडगोवातरुण मतदारनिवडणूक आयोगपंजाबपाच राज्यमणिपूरविधानसभा निवडणुक
Previous Post

बाबा रामदेवांच्या पतंजलीचा नवा दावा: हवनामुळे हवेतील संसर्गाचे विषाणू नष्ट होतात!

Next Post

योगी आदित्यानाथांसाठी समाजवादी नेत्याने केले गोरखपूरचे तिकीट बुक!

Next Post
IP Singh

योगी आदित्यानाथांसाठी समाजवादी नेत्याने केले गोरखपूरचे तिकीट बुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!