मुक्तपीठ टीम
लग्न म्हटलं की जोडीदार आलाच. पारंपरिकरीक लग्नात पती आणि पत्नी हे दोघे असतात. सध्याच्या काळात समलैंगिक विवाहही होतात, त्यातही जोडीदार असतोच असतो. पण गुजरातमधील बडोद्यात एक तरुणी वेगळंच लग्न करत आहे. तिथं एक तरुणी नेहमीच्या पारंपरिक विधींसह थाटामाटात लग्न करत आहे. ती हनीमूनलाही जाणार आहे. पण हे सारं ती एकटंच करणार आहे. या लग्नाची जोरदार चर्चा होत असल्यानं सोलोगामी म्हणून ओळखलं जाणारं हे लग्न असतं तरी कसं ते जाणून घेवूया…
सोलोगामी लग्न म्हणजे काय?
- सोलोगामी लग्न म्हणजे एक असं लग्न जिथं दुसरा जोडीदार नाही, फक्त वधू असते.
- वर नाही, लग्नाची मिरवणूक नाही, लग्नाचे कोणतेही विधी केले तर नाही तर तेही नाहीत.
- एक वधू, फक्त तिचा आवडते कपडे आणि दागिने घातलेली, नववधूसारखीच पूर्ण सजलेली.
- लग्नाचा सोहळाही तसाच जसा नेहमीचा असतो.
- त्या सोहळ्यात तिचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य, जेवण आणि फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी नेहमीसारखीच!
- भारतात प्रथमच क्षमा बिंदूमुळे सोलोगामी लग्न चर्चेत आलं आहे.
- मात्र, जपानी तरुणी गेल्या १०वर्षांहून अधिक काळ मोठ्या आनंदाने सोलोगामी विवाह करत असतात.
गुजरातमधील एकटीच्या स्वत:शीच लग्नाची गोष्ट…
- गुजरातमधील बडोद्यात ११ जून रोजी क्षमा बिंदू या तरुणीचे लग्न होणार आहे.
- ती संपूर्ण रितीरिवाजाने लग्न देखील करणार आहे.
- पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वर असणार नाही. तसंच अन्य कुणी जोडीदारही नाही.
- कारण क्षमा ही कोणत्याही वराशी लग्न करणार नसून स्वतःशीच लग्न करणार आहे.
- या लग्नात सर्व पारंपारिक विधी होतील.
- पण संपूर्ण लग्नात वर किंवा मिरवणूक असणार नाही.
- हा पहिलाच स्व-विवाह किंवा एकल विवाह असेल, असे बोलले जात आहे.
क्षमाला जोडीदारशिवाय व्हायचं होतं वधू!
- क्षमा बिंदूला कधीही लग्न करायचे नव्हते.
- पण तिला नवरी व्हायचं होतं.
- आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- ती म्हणाली, ‘कदाचित मी पहिली मुलगी आहे जिने स्वत:वरच प्रेमाचा मार्ग स्वीकारला आहे.
- क्षमाने आपल्या लग्नासाठी मंदिराची निवड केली आहे.
लग्नानंतर हनिमूनला जाणार!
- लग्नानंतर क्षमाही हनिमूनला जाणार आहे.
- ती दोन आठवड्यांसाठी गोव्याला हनिमूनला जाणार आहे.
- जेव्हा क्षमाने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय तिच्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला.
- मात्र समजूत काढल्यानंतर त्यांनी परवानगी दिली.
- या लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनीही तिला आशीर्वाद दिले आहेत.
वधूसारखं मिरवणं, फेबू-इंस्टावर झळकण्यासाठी लग्न!
- अनेक महिलांना लग्न करायचं नसतं, एकटंच राहायचं असतं, पण वधूसारखं मिरवायचं मात्र असतं.
- त्यासाठी त्या सोलोगामी विवाहाचा मार्ग निवडतात.
- मिरवून घेतात, फोटो काढतात, व्हिडीओ बनवतात, ते सारं इंस्टाग्राम, फेसबूकवर पोस्ट करणं हाही त्यांचा लग्नसमारंभामागचा उद्देश असतो.
- जपान, अमेरिका, युरोपातही सोलोगामी लग्नाचा ट्रेंड नवा नाही.
- तिथं काही कंपन्या अशी लग्न करण्याचं कंत्राट घेतात.