Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वे निर्माणात शशिकांत लिमये यांचे योगदान अविस्मरणीय

शोकसभेत मान्यवरांच्या भावना; इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट देणार 'एस. डी. लिमये स्मृती पुरस्कार'

June 3, 2022
in विशेष
0
The Indian Concrete Institute will provide 'S. D. Limaye Smriti Award '

मुक्तपीठ टीम

‘पुण्याचे मेट्रोमॅन’ अशी ओळख मिळालेल्या ज्येष्ठ अभियंता शशिकांत लिमये यांचे कोकण रेल्वे निर्माणात, अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे. रेल्वेच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटतर्फे यंदापासून ‘एस. डी. लिमये स्मृती पुरस्कार’ देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष उज्ज्वल कुंटे यांनी यावेळी जाहीर केले. कुटुंबीयांनीही त्यांच्या हृद्य आठवणींना उजाळा दिला.
शशिकांत लिमये यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. दि इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट यासह लिमये यांचे सक्रिय योगदान व मार्गदर्शन लाभलेल्या तांत्रिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने त्यांच्या शोकसभेचे आयोजन केले होते. फिरोदिया सभागृहात झालेल्या या शोकसभेला यावेळी पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे केंद्राचे माजी सचिव वसंतराव शिंदे, ‘सीओईपी’च्या प्राध्यापिका डॉ. सुहासिनी माढेकर,  इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष उज्ज्वल कुंटे, इंडियन ब्रिज इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष प्रा. व्ही. आर. फडके, इंडियन जिओ टेक्निकलचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे निवृत्त उपाध्यक्ष श्यामकांत धर्माधिकारी, अनिल जगताप, लिमये यांच्या पत्नी गीतांजली, कन्या योगिता, विनिता व बंधू रवींद्र लिमये उपस्थित होते.
अतुल गाडगीळ यांनी लिमये यांच्या मेट्रो प्रकल्पासाठीच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. बंधू एअर व्हाईस मार्शल रवींद्र लिमये यांनी भावना व्यक्त केल्या. कोकण रेल्वे निर्माण कार्यात त्यांनी मुख्य अभियंता  म्हणून काम पहिले होते. रेल्वेतील त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सेतू निर्माण केले. त्यांना त्यांच्या समृद्ध तांत्रिक कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यापैकी सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचा मानाचा एस. बी. जोशी स्मृती पुरस्कार, आयआयटी पवईचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, तसेच इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटच्या जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता.

Tags: Indian Concreate InstituteS D LimayeShashikant Limayeइंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटएस. डी. लिमयेशशिकांत लिमये
Previous Post

यूपीतील भन्नाट प्रकरण : म्हैशीचं रेडकू कुणाचं…आता पोलीस करणार डीएनए टेस्ट!

Next Post

तरुणी करणार लग्न, हनीमूनलाही जाणार, पण एकटीच! जाणून घ्या सोलोगामी लग्न असतं कसं?

Next Post
Kshama bindu

तरुणी करणार लग्न, हनीमूनलाही जाणार, पण एकटीच! जाणून घ्या सोलोगामी लग्न असतं कसं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!