Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

कवी केशवसुत पुरस्कार हबीब भंडारेंना, तर बहिणाबाई चौधरी पुरस्कार रमजान मुल्लांना!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
governor of maharashtra

मुक्तपीठ टीम

सन २०२१ या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक / साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या अंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्काराच्या यादीमध्ये वाङ्मय प्रकार आणि पुरस्काराची माहिती देण्यात आली आहे. यात वाङ्मयाचे प्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे, पुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली असून, पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक/ साहित्यिकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

वाङ्मयाचे प्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे नाव (पुस्तकाचे नाव), पुरस्काराची रक्कम

  • प्रौढ वाङ्मय- काव्य प्रकारासाठी कवी केशवसुत पुरस्कार : हबीब भंडारे (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता) – रुपये १ लाख
  •  प्रथम प्रकाशन- काव्य प्रकारासाठी बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टान्त) – रुपये ५० हजार
  • प्रौढ वाङ्मय- नाटक/एकांकिका प्रकारासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा) – रुपये १ लाख
  • प्रौढ प्रकाशन- नाटक/एकांकिका प्रकारासाठी विजय तेंडुलकर पुरस्कार : शिफारस नाही
  • प्रौढ वाङ्मय – कादंबरी प्रकारासाठी हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशान्त बागड (नवल) – रुपये १ लाख.
  • प्रथम प्रकाशन- कादंबरी प्रकारासाठी श्री.ना.पेंडसे पुरस्कार : स्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं) – रुपये ५० हजार
  • प्रौढ वाङ्मय- लघुकथा प्रकारासाठी दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा)- रुपये १ लाख
  • प्रथम प्रकाशन- लघुकथा प्रकारासाठी ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिसिंग) – रुपये ५० हजार
  • प्रौढ वाङ्मय-ललितगद्य (ललित विज्ञानासह) प्रकारासाठी अनंत काणेकर पुरस्कार : डॉ.नीलिमा गुंडी (आठवा सूर) – रुपये १ लाख
  •  प्रथम प्रकाशन- ललितगद्य प्रकारासाठी ताराबाई शिंदे पुरस्कार: वीणा सामंत (साठा उत्तरासाठी कहाणी) – रुपये ५० हजार
  • प्रौढ वाङ्मय – विनोद प्रकारासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून) – रुपये १ लाख
  • प्रौढ वाङ्मय- चरित्र प्रकारासाठी न.चि.केळकर पुरस्कार : वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी) – रुपये १ लाख
  • प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा) – रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय- समीक्षा/ वाङ्मयीन/ संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखनासाठी श्री.के.क्षीरसागर पुरस्कार : दीपा देशमुख (जग बदलणारे ग्रंथ) – रुपये १ लाख
  •  प्रथम प्रकाशन- समीक्षा सौंदर्यशास्त्र प्रकारासाठी रा.भा.पाटणकर पुरस्कार : प्रा.डॉ.प्रकाश शेवाळे (अनुष्टुभ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान) — रुपये ५० हजार
  •  प्रौढ वाङ्मय-राज्यशास्त्र /समाजशास्त्र प्रकारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : सुरेश भटेवरा (शोध..नेहरू-गांधी पर्वाचा!) – रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय- इतिहास प्रकारासाठी शाहू महाराज पुरस्कार : शशिकांत गिरिधर पित्रे (जयतु शिवाजी, जयतु शिवाजी) – रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय- भाषाशास्त्र /व्याकरण प्रकारासाठी नरहर कुरुंदकर पुरस्कार : सदानंद कदम (मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी वाक्प्रचारांची) – रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय- विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) प्रकारासाठी महात्मा जोतीराव फुले पुरस्कार : अरुण गद्रे (उत्क्रांती:एक वैज्ञानिक अंधश्रद्धा? ) रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन प्रकारासाठी वसंतराव नाईक पुरस्कार : सचिन आत्माराम होळकर (शेती शोध आणि बोध), रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय- उपेक्षितांचे साहित्य प्रकारासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : सुखदेव थोरात (वंचितांचे वर्तमान), रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र विषयक लेखनासाठी सी.डी.देशमुख पुरस्कार : शिफारस नाही,
  •  प्रौढ वाङ्मय – तत्वज्ञान व मानसशास्त्र प्रकारासाठी ना.गो.नांदापुरकर पुरस्कार : डॉ.आर.के.अडसूळ (सुखाचे मानसशास्त्र) – रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय-शिक्षणशास्त्र प्रकारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार : डॉ.साहेबराव भुकण (विनोबा आणि शिक्षण)- रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय – पर्यावरण प्रकारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार :विद्यानंद रानडे (पाण्या तुझा रंग कसा ?) – रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय -संपादित/ आधारित प्रकारासाठी रा.ना.चव्हाण पुरस्कार : संपादक किशोर मेढे (दलित -भारत मधील अग्रलेख) – रुपये १ लाख.
  •  प्रौढ वाङ्मय -अनुवादित प्रकारासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार : अनुवादक अनघा लेले (फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन) – रुपये १ लाख.
  • प्रौढ वाङ्मय – संर्कीण प्रकारासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार : आनंद करंदीकर (वैचारिक घुसळण) – रुपये १ लाख.
  •  बाल वाङ्मय – कविता प्रकारासाठी बाल कवी पुरस्कार : विवेक उगलमुगले (ओन्ली फॉर चिल्ड्रन) – रुपये ५० हजार
  •  बाल वाङ्मय – नाटक व एकांकिका प्रकारासाठी भा.रा.भागवत पुरस्कार : डॉ.सोमनाथ मुटकुळे (खेळ मांडियेला). – रुपये ५० हजार
  •  बाल वाङ्मय – कादंबरी प्रकारासाठी साने गुरुजी पुरस्कार सौ.वृषाली पाटील (पक्षी गेले कुठे? ) – रुपये ५० हजार
  •  बाल वाङ्मय – कथा प्रकारासाठी राजा मंगळवेढेकर पुरस्कार : सुहासिनी देशपांडे (किमयागार) – रुपये ५० हजार
  •  बाल वाङ्मय -सर्वसामान्य ज्ञान प्रकारासाठी यदुनाथ थत्ते पुरस्कार : प्रा.सुधाकर चव्हाण, (चला शिकूया वारली चित्रकला) – रुपये ५० हजार
  •  बाल वाङ्मय- संकीर्ण प्रकारासाठी ना.धो ताम्हणकर पुरस्कार: प्रा.विद्या सुर्वे बोरसे (कोरा कागद निळी शाई) – रुपये ५० हजार
  •  सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारासाठी सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार : परेश वासुदेव प्रभू (गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य) – रुपये १ लाख.

 


Tags: Bahinabai Chaudhary Awardgood newsHabib BhandareKavi Keshavsut AwardmuktpeethRamzan MullaState Literary AwardYashwantrao chavanकवी केशवसुत पुरस्कारघडलं-बिघडलंचांगली बातमीबहिणाबाई चौधरी पुरस्कारमुक्तपीठयशवंतराव चव्हाणरमजान मुल्लाराज्य वाङ्मय पुरस्कारहबीब भंडारे
Previous Post

भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या मिनरनल्स अँड मेटल्स व्यवसायाला नवे कंत्राट

Next Post
L&T Construction

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या मिनरनल्स अँड मेटल्स व्यवसायाला नवे कंत्राट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!