मुक्तपीठ टीम
भारताने यामाहा मोटर नवीन जनरेशन यामाहा R15 V4 आणि R15M लाँच केली आहे. या दोन्ही मोटारसायकली 21 सप्टेंबर 2021 रोजी लॉन्च करण्यात आली. याला YZF R15 V4 नाव देण्यात आले आहे. एन्ट्री लेवल सुपरस्पोट्स मोटरसाठी नवीन मॉडेलमध्ये खूप सारे बदल करून मार्केटमध्ये लाँच केले. यामहा R15 ची किंमत 1,67,800/- रूपये आणि R15M ची किंमत 1,77,800/- रूपए आहे. त्याचसोबत कंपनीने Aerox स्कूटरही लाँच केली आहे. याची किंमत 1,29,000/- रूपये आहे.
- याआधीच्या माँडल पेक्षा आता नव्याने लाँच झालेले हे माँडल खूप अॅडवान्स लेव्हलचे आहेत.
- R15 हे मॉडल R7 च्या डिजाइनपासून प्रेरणा घेऊन आकारास आले आहे.
- यामध्ये अपडेट डिझाइन जसे फ्रंट एप्रन जिथे दोन्ही बाजुला एलइडी डीआरएल द्वारे एलइडी प्रोजेक्टरचा एक नविन सिंगल बीम दिला आहे.
- याव्यतिरीक्त यामाहा ने एक R15 चा नविन बॉडी पॅनल लावले आहे.
- पुन्हा डिजाइन केलेला टेल सेक्शन आणि मस्कुलर फ्यूल टँकचा यात समावेश आहे.
- R15 आताही त्याच 155cc, सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिनने संचलित आहे, ज्याला स्पीड गियरबाँक्स जोडलेलं आहे.
- वीवीए मोटर 18.3 बीएचपी आणि 14.1 एनएम पीक टाँर्क उत्पन्न करतो आणि यामध्ये कंट्रोल व क्विकशिफ्टरही आहे.
यामाहा Aerox 155 मैक्सी स्कूटर मध्ये एलइडी हेडलाइट, एलइडी डीआरएल, एलइडी टेल लेप, चार्जिंग साँकेट, ब्लूटूथ कनेक्टिविटी, ईत्यादी फिचर्स उपलब्ध आहेत.