Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

याकुब मेमनची कबर सजवण्यासाठी दहशतवादी टायगर मेमनकडून धमकी! ३ वर्षांपूर्वी लागल्या संगमरवरी लाद्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yakub Memon

मुक्तपीठ टीम

मुंबईलाच नाही तर देशाला हादरवणाऱ्या १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनची कबर सजवल्याचा वाद चिघळत चालला आहे. भाजपा आणि शिवसेनेत या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलं आहे. या प्रकरणात नुकतीच नवी माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी दहशतवादी टायगर मेमन याच्या नावाने याकुब मेमनच्या कबरीला सजवण्यासाठी धमकी देण्यात आल्याचं कळत आहे.

याकुब मेमनच्या कबरीचा वाद का सुरू आहे?

  • दहशतवादी मेमनला २०१५ मध्ये नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली आणि दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानात त्याला दफन करण्यात आले.
  • मेमनच्या कबरीभोवती तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८मध्ये संगमरवरी लाद्या लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
  • नुकतेच मुंबई पोलिसांनी दहशतवाद्याच्या कबरीभोवती लावलेले ‘एलईडी लाईट’ हटवले.
  • एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाचे पोलीस अधिकारी एका दहशतवाद्याच्या कबरीला ‘एलईडी दिवे’ कोणी लावले आणि संगमरवरी लाद्यांनी कबर कशी सजवली याचा तपास करतील.

कब्रिस्तानच्या पूर्व ट्रस्टींचा टायगर मेमनकडून धमकी मिळाल्याचा दावा

  • तक्रारदार कब्रिस्तानचे माजी ट्रस्टींने धमकी देणाऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितले की, हे कृत्य त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही आणि त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही.
  • मात्र त्यानंतरही तक्रारदाराला फोन आणि एसएमएस करून मागणी पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यानंतरही तक्रारदाराने ऐकले नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
  • मोहम्मद मेमन म्हणाला की, याकूब भाई शहीद झाला आहे. मात्र, टायगर भाई अजूनही जिवंत आहे. त्यामुळे बडा कब्रस्तानमध्ये जागा द्या नाहीतर टायगर तुम्हाला गायब करेल.
  • या धमकीनंतरही आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे तक्रारदार पूर्व ट्रस्टींने म्हटले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Tags: 993 Bomb Blast Case९९३ बॉम्बस्फोट प्रकरणBJPmuktpeethmumbaiShivsenaTerrorist Tiger MemonYakub Memon's Tombघडलं-बिघडलंदहशतवादी टायगर मेमनभाजपामुक्तपीठमुंबईयाकुब मेमन कबरशिवसेना
Previous Post

अमरावतीत लव्ह जिहाद की राजकीय जिहाद? तरुणीचा खासदार नवनीत राणांवर बदनामीचा आरोप!!

Next Post

राज्यात ९५५ नवे रुग्ण, ९७२ बरे! मुंबई २५१, नाशिक १५, नागपूर ०८ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात ९५५ नवे रुग्ण, ९७२ बरे! मुंबई २५१, नाशिक १५, नागपूर ०८ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!