Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमरावतीत लव्ह जिहाद की राजकीय जिहाद? तरुणीचा खासदार नवनीत राणांवर बदनामीचा आरोप!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
navneet rana

मुक्तपीठ टीम

गेले काही दिवस अमरावतीत लव्ह जिहाद झाले असा आरोप करत खासदार नवनीत राणा आणि भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात खळबळ माजवली. खासदार राणा यांनी तर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांवरही आरडाओरडा केला. त्यांचा मोबाइल फोनकॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप केला. पण आता ज्या तरुणीच्या कथित बेपत्ता प्रकरणाच्या आधारे हे राजकारण सुरु होते, त्या तरुणीने पुढे येत आपण घरातील भांडणामुळे घर सोडून गेलो होतो, असे स्पष्ट केले आहे. तसेच नवनीत राणांवर आपली नाहक बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आधी पोलिसांवर आक्रस्ताळी हल्ला आणि आता तरुणीचा बदनामीचा आरोप, यामुळे खासदार राणा आणि भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी अडचणीत आले आहेत.

अमरावती येथे कथित लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता असलेल्या तरूणीचा शोध लागला आहे. बेपत्ता झालेली ही तरुणी अखेर चार दिवसांनंतर अमरावतीत पोहोचली. या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही १९ वर्षीय तरूणी बेपत्ता होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले होते. यावर भाजप खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप तसेच मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. मात्र, त्या मुलीने आता राणांवरच तिची बदनामी केल्याचा आरोप केला.

अमरावतीतील राजकीय जिहाद?

  • अमरावतीतील एक तरुणी घरातून बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबाने पोलीस तक्रार केली होती.
  • खासदार नवनीत राणा आणि भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केल्यामुळे अमरावतीत खळबळ माजली होती.
  • यामुळे अमरावतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • त्यातच नवनीत राणा यांनी पोलीस उपायुक्तांवर कॉल रेकॉर्डिंगचा आरोप करत आक्रस्ताळा हल्ला चढवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
  • राणांचा आरडाओरडा आणि पोलीस अधिकाऱ्यांचं भीतीग्रस्त वागणं यामुळे राजकारण तापलं होतं.
  • पोलीस स्टेशनमध्ये चांगलाच वाद झाला होता.
  • त्यातच पोलीस कुटुंबीय राणांविरोधात रस्त्यावरही आले.
  • त्यातच बुधवारी ७ सप्टेंबर रोजी सातारा पोलिसांनी बेपत्‍ता झालेल्‍या युवतीचा शोध लावला.
  • साताऱ्यावरून अमरावती पोलीस त्या तरुणीला घेऊन आले.
  • तसेच राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तिचा जबाब नोंदवण्यात आला.
  • तरुणीने आपण घरातील भांडणांमुळे घर सोडल्याचा दावा केला.
  • तसेच तिने खासदार नवनीत राणांवर लव्ह जिहादचा आरोप करत तिची बदनामी केल्याचा आरोप केला.
  • तरुणीच्या आरोपानंतर या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.

आपला जबाब नोंदवत या तरूणीने म्हटले की, ‘लव्ह जिहाद असा काही प्रकार नाही आहे, मी स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. खासदार नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचा गंभीर आरोपही या तरुणीने यावेळी केला.” पोलिसांनी तरुणीचा जबाब घेऊन तिला आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे.


Tags: Amravitdefamation allegationsKhasdar Navneet RanaLove JihadmuktpeethState Jihadअमरावतीतखासदार नवनीत राणाघडलं-बिघडलंबदनामी आरोपमुक्तपीठराजकीय जिहादलव्ह जिहाद
Previous Post

ममता बॅनर्जींचं आता देशव्यापी मिशन खेला होबे! भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी इतरांशी हातमिळवणी!

Next Post

याकुब मेमनची कबर सजवण्यासाठी दहशतवादी टायगर मेमनकडून धमकी! ३ वर्षांपूर्वी लागल्या संगमरवरी लाद्या!

Next Post
Yakub Memon

याकुब मेमनची कबर सजवण्यासाठी दहशतवादी टायगर मेमनकडून धमकी! ३ वर्षांपूर्वी लागल्या संगमरवरी लाद्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!