मुक्तपीठ टीम
शाओमी, सॅमसंग, ओप्पो, रियलमी आणि याशिवाय अनेक कंपन्या वेगवान चार्जिंगसह स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. पण आता या स्पर्धेत शाओमी इतर सर्व कंपन्यांना मागे टाकू शकते. वास्तविक पाहाता, शाओमी त्याच्या पुढच्या फ्लॅगशिप फोनमध्ये २०० वॅटचा चार्जर देऊ शकते, जो स्मार्टफोन वेगवान चार्ज करण्यात मदत करेल.
असे सांगितले जात आहे की, शाओमी या वर्षी आपला एक फ्लॅगशिप फोन बाजारात आणणार आहे. ज्यामध्ये तो २०० वॅटचा वेगवान चार्जर देऊ शकेल. हे डिव्हाइस तयार होत असून अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृत रित्या या माहितीला दुजोरा दिलेला नाही. पण अशा प्रकराचा चार्जर देणाचा कंपनी विचार करत असेल तर तो आतापर्यंतचा सर्वात वेगवान चार्जर असेल.
रिव्हर्स चार्जिंगचे फिचर
एका अहवालानुसार, शाओमीचा हा स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करेल. जो एका पॉवर बँकेप्रमाणे इतर स्मार्टफोन चार्ज करण्यास मदत करु शकेल. तसेच शाओमीचा हा आगामी फ्लॅगशिप फोन शाओमी मी ११ अल्ट्रा असल्याचे म्हटले जात आहे. हा फोन मी ११ सीरिजचा एक भाग असेल, ज्याला कंपनीने चीनमध्ये लॉन्च करुन जागतिक स्तरावरही सादर केला आहे.
या कंपनीचेही १२० वॅटच्या चार्जरसह लॉन्च केले स्मार्टफोन
शाओमीने गेल्या वर्षी ‘शाओमी मी १० अल्ट्रा’ सोबत १२० वॅटचा वायर चार्जर दिला आहे. अशा स्थितीत जेव्हा कंपनी ‘शाओमी मी ११’ सीरिजचा अल्ट्रा व्हेरिएंट लॉन्च करेल तेव्हा २०० वॅटचा वायर्ड चार्जरदेखील लॉन्च करू शकते. आतापर्यंत, व्हिवो आयसीयू ७ आणि नुबिया रेड मॅजिक ६ प्रो हे स्मार्टफोन १२० वॅटच्या चार्जरसह लॉन्च केले आहेत.