मुक्तपीठ टीम
छत्रसाल स्टेडिअयमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्येप्रकरणी आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १५ दिवस फरार असणाऱ्या सुशील कुमारसह त्याचा सहकारी अजयला दिल्लीतून अटक केली आहे. सुशील कुमारवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते तर त्याचा सहकारी अजय याच्यावर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, एसीपी अतर सिंह यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने सुशील कुमारला अटक करण्यात यश आले.
सुशील कुमारकडून सतत पोलिसांना चकवा-
- पैलवान सागरच्या हत्येनंतर फरार सुशील कुमार दिल्ली पोलिसांना चकवा देण्यात रोज यशस्वी होत होता.
- यापूर्वी शनिवारी त्याच्या अटकेबाबत बरीच अफवा पसरली होती.
- शनिवारी पंजाबमधील काही लोकांच्या ट्विटने सुशील आणि अजय यांनी पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती व्हायरल झाली होती.
- यानंतर या दोघांनाही पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
- ट्विटच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनीही अटकेचा दावा केला होता पण संध्याकाळपर्यंत ही अफवा असल्याचे दिसून आले.
अनेक राज्यात पोलिसंचा छापा-
- ५ मे रोजी सागरच्या मृत्यूनंतर सुशील त्याच्या इतर सहकाऱ्यांसह फरार झाला होता.
- यानंतर, दिल्ली पोलिसांनी १५ मे रोजी सुशील आणि इतर सहा साथीदारांविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट घेतला.
- दिल्ली पोलिसांच्या सुमारे १५ पथकांनी पंजाबमधील विविध भागात छापा टाकला होता.
- पण तो सापडला नाही.
- सुशील आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी हरियाणामधील उत्तराखंड आणि बहादुरगडसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.