Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल! चिनाब रेल्वे पूल संरक्षणासाठी उपयोगी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Chenab Railway Bridge

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आता भारतात आहे. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे काम नुकतेच पूर्ण झालं. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेनं हा पूल उभारला आहे. या पुलामुळे प्रवाशांना फायदा होईलच. तसंच दोन देशांच्या सीमा जवळ असल्याने हा पूल संरक्षणासाठीही उपयोगी आहे.

 Chenab Railway Bridge

जगातील सर्वात उंच भारतीय रेल्वे पूल आहे तरी कसा?

  • १७ खांब असलेला चिनाब रेल्वे पूल ही अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठी कामगिरी मानली जाते.
  • त्याची लांबी १३१५ मीटर असून पूल ३५९ मीटर उंचीवर बांधलेला आहे.
  • हा पूल १०० किमी वेगाने रेल्वे गाड्या चालवण्यासाठी बनवण्यात आला आहे.
  • चिनाब पुलाचे जीवन १२० वर्षे मानले गेले आहे.
  • तीव्र भूकंपही या पुलाचे नुकसान करू शकत नाही.
  • टीएनटीचे स्फोट सहन करण्याची क्षमताही या पुलामध्ये आहे.
  • अभिमानाची बाब अशी की, हा पूल भारतीय रेल्वेने तयार केला आहे.
  • तो बनवण्यासाठी आतापर्यंत २८ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • आता देशवासीयांसाठी रेल्वेने जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.

 Chenab Railway Bridge

देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा पूल!

  • चिनाब रेल्वे पूल देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
  • पुलापासून थोड्याच अंतरावर दोन देशांसोबतची भारताची सीमा आहे.
  • चिनाब पुलाचे काम पूर्ण झाल्याने लष्कराला रेल्वेने सहज ये-जा करणे शक्य होणार आहे.
  • चिनाब रेल्वे ब्रिज जम्मूमधील कटरा आणि काश्मीरच्या लांब दुर्गम रस्त्याला जोडण्यासाठी काम करेल.
  • हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक लाइनचा भाग आहे.
  • रेल्वे मंत्री अश्निनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चिनाब रेल्वे पुलाच्या डेक क्लोजर समारंभाचा व्हिडिओ पोस्ट करून गोल्डन जॉइंट काम पूर्ण झाल्याची माहिती दिली.
  • याआधी पुलाचा फोटो शेअर करताना रेल्वेमंत्र्यांनी लिहिले की, ढगांच्या वर जगातील सर्वात उंच कमान असलेला चिनाब ब्रिज.
  • चिनाब रेल्वे पुलाचे चित्र पाहून ते एखाद्या पेंटिंगपेक्षा कमी वाटत नाही.

पाहा:


Tags: Chenab Railway Bridgegood newsIndiaindia SecuritymuktpeethWorld's Tallest Railway Bridgeघडलं-बिघडलंचांगली बातमीचिनाब रेल्वे पूलजगात उंच रेल्वे पूलदेश सुरक्षाभारतमुक्तपीठ
Previous Post

राज्यात १८०० नवे रुग्ण, २,८१२ बरे! मुंबई ९७५, नाशिक ४, नागपूर ६ नवे रुग्ण !!

Next Post

उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रम!

Next Post
ICAI MSME Yatra

उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!