Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रम!

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: 'आयसीएआय एमएसएमई यात्रा' १९ ऑगस्ट रोजी पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये...

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
ICAI MSME Yatra

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’च्या औचित्याने दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे ‘आयसीएआय एमएसएमई सेतू’ आणि ‘आयसीएआय एमएसएमई यात्रा’ आयोजिली आहे. याअंतर्गत ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ही ‘आयसीएआय एमएसएमई यात्रा’ शुक्रवारी (दि. १९ ऑगस्ट) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दाखल होत आहे. ‘आयसीएआय’च्या पुणे व पिंपरी शाखेच्या वतीने व ‘एमसीसीआयए’च्या सहकार्याने या यात्रेचे स्वागत केले जाणार असून, पदाधिकाऱ्यांकडून या रथयात्रेचे समन्वयन केले जात आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देणाऱ्या विविध प्रयत्नांचे प्रदर्शन असलेला रथ शहरात फिरणार आहे. यानिमित्ताने ‘एमसीसीआयए’, भोसरी ब्रांच, जे-४६२, टेल्को रोड, क्वालिटी सर्कलसमोर, गणेशनगर, भोसरी, पुणे येथे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी दिली.

चंद्रशेखर चितळे म्हणाले, “विविध भागधारक आणि एमएसएमई यांच्यातील दुवा म्हणून सनदी लेखापाल (सीए) महत्वाची भूमिका बजावत आहेत. ‘एमएसएमई’च्या गरजांना तात्काळ प्रतिसाद देणारा घटक म्हणून सीए काम करतो. ‘आयसीएआय एमएसएमई सेतू’ आणि ‘आयसीएआय एमएसएमई यात्रा’ यामधून ‘एमएसएमई’ प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमात ‘एमएसएमई क्लिनिक’चे आयोजन केले असून, त्यामध्ये भारत सरकारच्या ‘एमएसएमई’ मंत्रालयातील प्रतिनिधी, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे (सिडबी) प्रतिनिधी, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे (एनएसआयसी) प्रतिनिधी, बँक अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी व सनदी लेखापाल मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, दिवसभर मोफत उद्यम नोंदणी करून दिली जाणार आहे.”

‘आयसीएआय’च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखेच्या पुढाकारातून दिवसभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विविध संस्था, प्रादेशिक विभाग, स्थानिक चेंबर्स, इंडस्ट्री असोसिएशन, एमएसएमई केंद्रे यांच्या प्रतिनिधींनी अधिकाधिक संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ‘एमएसएमई’वर जागृतीपर कार्यक्रमात फंडिंग, अर्थसहाय्य व अनुदान, इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, इन्सेन्टिव्ह, केंद्र सरकारच्या योजना, राज्याच्या योजना, सीएची भूमिका, आयात-निर्यात अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी ८२३७१६६००६ किंवा ९५०३१११८३६ यावर संपर्क करण्याचे आवाहन चितळे यांनी केले आहे.

 

पाहा:


Tags: EntrepreneurshipFreedom Amrit Mahotsavgood newsICAI MSME YatramuktpeethPune-Pimpri-Chinchwadआयसीएआय एमएसएमई यात्राउद्योजकताचांगली बातमीपुणे-पिंपरी-चिंचवडमुक्तपीठस्वातंत्र्य अमृतमहोत्सव
Previous Post

भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल! चिनाब रेल्वे पूल संरक्षणासाठी उपयोगी!!

Next Post

अमेरिकेच्या बोस्टनमध्ये दुमदुमला भारतमातेचा जयघोष

Next Post
Independence Amrit Mahotsav

अमेरिकेच्या बोस्टनमध्ये दुमदुमला भारतमातेचा जयघोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!