मुक्तपीठ टीम
स्मार्टफोनच्या जगात मोठ्या स्क्रिनचं आकर्षण असणारा एक ग्राहक वर्ग असतो, तसाच खिशात ठेवण्यासाठी सोयीचा म्हणून अगदीच छोट्या स्मार्ट फोनचंही अनेकांना आकर्षण असतं. त्यामुळे छोटे फोन बर्याच वेळा लाँच करण्यात आले आहेत. आता मात्र मॉनी मिस्ट या कंपनीनं लाँच केलेला स्मार्ट फोन हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन आहे. हा 4जी स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. मॉनी मिस्ट हा युजर्सच्या तळहातावर सहज बसतो. दिसायला हा फोन आयफोन सारखा आहे. कंपनीने या फोनची रचना आयफोन 4 प्रमाणेच ठेवली आहे. कारण, कंपनीला या माध्यमातून स्टीव्ह जॉब्स यांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे.
जाणून घ्या काय आहे, या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फिचर्स…
किंमत
- मॉनी मिस्ट हा 4 जी स्मार्टफोन आहे जो अँड्रॉइड ९ पाई ओएससह येतो.
- या फोनची विक्री अद्याप सुरू झालेली नाही.
- सध्या ९९ डॉलर्समध्ये (सुमारे ७,४०० रुपये) क्राऊडफंडिंग वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- बाजारात कंपनी हा डिव्हाईस ११,००० रुपये किंमतीसह लाँच करू शकते.
मॉनी मिस्टची फिचर्स
- मॉनी मिस्ट स्मार्टफोन ब्लॅक कलरमध्ये येतो.
- या फोनची लांबी ८९.५ मिमी, रुंदी ४५.५ मिमी आणि जाडी ११.५ मिमी आहे.
- हा फोन खूपच लहान आणि हलका आहे, म्हणून तो कोठेही सहजपणे नेला जाऊ शकतो.
मॉनी मिस्ट: स्पेसिफिकेशन
- मॉनी मिस्टमध्ये ३ इंच एलसीडी डिस्प्ले आहे.
- ४८०x ८५४ पिक्सेल रिझोल्यूशनसह देत आहे.
- जो १६: ९ च्या आस्पेक्ट रेशियोसह येतो.
- प्रोसेसर म्हणून कंपनी सात वर्षांचा मीडियाटेक एमटी ६७३५ चिपसेट त्यामध्ये देत आहे.
- फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो.
- मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळणार नाही.
- या छोट्या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे जो १३ मेगापिक्सलचा सेन्सरसह येतो.
- सेल्फीसाठी, मॉनी मिस्टमध्ये फ्रंट व्हीजीए कॅमेरा आहे.
- मागील कॅमेरा इलेक्ट्रॉनिक प्रतिमा स्थिरीकरण (ईआयएस) सह ४८० पिक्सल वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
- फ्रंट कॅमेरा ४८० पिक्सल वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
- फोनला पावर देण्यासाठी यामध्ये १२५०mAh बॅटरी आहे.
- यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ड्युअल मायक्रो सिम स्लॉट आहे.
- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल मायक्रो-सिम स्लॉट, वाय-फाय, 4 जी, ब्लूटूथ आहे.