मुक्तपीठ टीम
बांधणीची कला ही अत्यंत कुशल प्रक्रिया आहे. बांधणीमध्ये वापरण्यात येणारा मुख्य रंग पिवळा, लाल, निळा, हिरवा आणि काळा आहे. कापड रंगवण्याची आणि बांधण्याची अतिशय प्राचीन बांधणी कला केवळ राजस्थानपुरती मर्यादित नाही, तर ती उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात आणि विशेषतः जामनगरमध्येही प्रचलित आहे. जामनगरमध्ये राहणारे लोक मोठ्या संख्येने या व्यवसायात गुंतलेले आहेत. बांधणी बनवण्याचा व्यवसाय जामनगरमधील किमान ५०,००० लोकांना रोजगार देऊन उदरनिर्वाह करतो. आता बांधणीमुळे जामनगरला जागतिक ओळख मिळाली आहे. जामनगरला GI टॅग ही मिळाला आहे.
बांधणीमुळे जामनगरला जागतिक ओळख…
- बांधणी ही एक पारंपारिक कला आहे.
- कपडे रंगवणे आणि त्यावर कलाकृती बनवणे.
- साड्या, ओढण्या आणि स्टोल्ससाठी कापडी साहित्य तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- या कलेने जामनगरला जगभरात ओळख मिळवून दिली आहे.
- या कामात केवळ पुरुषच नाही तर तिथल्या महिलांचाही मोठा वाटा आहे.
- पुरुष कपडे रंगवतात आणि स्त्रिया ते बांधतात.
- हे मॅन्युअल काम आहे आणि त्यात कोणतीही मशीन वापरली जात नाही.
महिलांनाही रोजगार संधी…
- जामनगरमध्ये बांधनीच्या कामामुळे येथील महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
- अत्यंत अवघड काम असूनही बांधणीचे काम त्या मनापासून करतात.
- हा पारंपारिक वारसा असून तो असाच जपता आला पहिजे.
बांधणीमुळे जामनगर GI टॅगचा मानकरी!!
- जामनगरच्या बांधनीला जीआय टॅग मिळाला आहे.
- बांधणी येथून भारताच्या विविध भागात आणि भारताबाहेरही निर्यात केली जाते.
- विशेषत: ज्या देशांमध्ये गुजराती आणि मारवाडी भारतीय लोक राहतात.
- याशिवाय टीव्ही मालिका आणि बॉलिवूडमध्येही याला मोठी मागणी आहे.
- चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी कपड्यांमध्ये याचा वापर केला जातो.
- कारागीर ग्राहकांच्या मागणीनुसार फॅब्रिक डिझाइन करतात.
- व्यवसायिक विबोध शहा म्हणाले की, भारत सरकारच्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेमुळे आम्हाला त्यांच्याकडून मोफत स्टॉल्सही मिळतात आणि त्यांचे सहकार्यही आम्हाला मिळते.
- सरकार कारागिरांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्यास मदत करते ज्यामुळे त्याच्या विक्रीवर परिणाम होतो.
पर्यावरण आणि आरोग्यासाठी अनुकूल रंगांचा वापर!
- ५० वर्षांपूर्वी, कपडे रंगविण्यासाठी रासायनिक रंग वापरले जात होते.
- ते रंग पर्यावरणास अनुकूल किंवा आरोग्यदायी नव्हते.
- रासायनिक रंगांमुळे भारतीय आणि युरोपीय लोकांना अनेकदा त्वचेच्या ऍलर्जीसारखे आजार होतात.
- सरकारने पर्यावरणाच्या अनुकूलतेनुसार रंग तयार करण्यास सांगितले.
- सरकारच्या धोरणांनुसार आता येथून निर्यात होणाऱ्या ९५ टक्के बांधणी पर्यावरणपूरक रंगांनी बनवल्या जातात.
- व्यावसायिक विबोध शाह यांनी सांगितले की, जामनगरची बांधणी प्रसिद्ध होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, इथे रंगवण्याची प्रक्रिया आणि वापरलेले पाणी, ज्यामुळे त्याला एक विशिष्ट रंग मिळतो जो सहजासहजी कोमेजत नाही.