Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक रेबीज दिवस साजरा

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
World Rabies Day

मुक्तपीठ टीम

“रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे उद्गार पुण्यातील नायडू संसर्गजन्य आजाराचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाठसुते यांनी येथे काढले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या जागतिक रेबीज दिवसाच्या निमित्ताने ते बोलत होते. दरवर्षी २८ सप्टेंबर हा लुई पाश्चर यांचा मृत्यूदिन जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ‘ वन हेल्थ झिरो डेथस ‘ हे या वर्षीच्या रेबीज दिनाचे घोषवाक्य आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषधशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मालन परांडे, राज्य माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ.अशोक रणदिवे आणि राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ‘ देह मंदिर चित्त मंदिर’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले. यावेळी त्यांनी रेबीज हा एक दुर्लक्षित आजार असला तरी त्यामुळे देशांमध्ये आणि राज्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे, हे सांगून हे मृत्यू २०३० पर्यंत शून्यावर आणणे सहज शक्य आहे पण त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यामधील समन्वय, वन हेल्थ संकल्पनेनुसार करावयाची कार्यवाही,कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबाबत जनप्रबोधन आणि रेबीज प्रतिबंधक लस तसेच सिरम यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल, हे स्पष्ट केले.डॉ. मालन परांडे यांनी रेबीज संदर्भातील सखोल माहिती श्रोत्यांना दिली तसेच श्रोत्यांचे शंका समाधान देखील केले. रेबीज मुळे होणाऱ्या मृत्युमध्ये लहान मुलांचे प्रमाण मोठे असते,हे लक्षात घेता आपण याबाबत अधिक सावध असेल पाहिजे आणि कुत्रा चावल्यानंतर ती जखम वाहत्या पाण्याखाली साध्या साबणाने १५ मिनिटे धुतल्यामुळे रेबीज होण्याची शक्यता निम्म्याहून अधिक प्रमाणात कमी होते, हे ही त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी श्वान दंशावर पारंपरिक उपचार न घेता लस आणि सिरम वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतले तर रेबीज निर्मूलन सहजशक्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. कैलास बाविस्कर यांनी यावेळी सार्वजनिक आरोग्य संदर्भातील कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य शिक्षण हे महत्त्वाचे असून यासंदर्भात राज्य आरोग्य माहिती आणि जनसंपर्क विभाग करत असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी भारती विद्यापीठ नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी तसेच विविध विभागातील आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोक उपस्थित होते. श्री. रुपेश दरेकर आणि श्रीमती श्रावणी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

डॉ. भालचंद्र प्रधान यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे रेबीज संदर्भात महत्त्वाची जनजागृती झाली असून असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता अनेकांनी यावेळी बोलून दाखविली.


Tags: muktpeethpublic health departmentWorld Rabies Dayघडलं-बिघडलंजागतिक रेबीज दिवसमुक्तपीठसार्वजनिक आरोग्य विभाग
Previous Post

सर्वोच्च न्यायालय दशकानुदशकं तुंबलेल्या प्रकरणाचा निचरा करणार! ऑक्टोबरपासून सुनावणी!

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ऐतिहासिक वैभव जपत लाभणारी ग्लोबल झळाळी असणार तरी कशी?

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ऐतिहासिक वैभव जपत लाभणारी ग्लोबल झळाळी असणार तरी कशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!