Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुलांचे भावविश्व खेळातून विकसित व्हावे : अनिकेत आमटे

लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, स्मार्ट चॅम्प पुणे यांच्या वतीने ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ प्रदर्शन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
World of Puzzles

मुक्तपीठ टीम

“मोबाईल, इंटरनेट, कार्टून या सगळ्यांपासून थोडेसे वेगळे होत मुलांचे भावविश्व विकसित होण्याची गरज आहे. त्यासाठी मेंदूला चालना देणारे खेळ, कोडी, वाचन, जिज्ञासू वृत्ती घडवणारे उपक्रम राबवायला हवेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला, बुद्धीला चालना व प्रोत्साहन देणारे उपक्रम घेण्याची आज गरज आहे,” असे मत गडचिरोलीच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी व्यक्त केले.
World of Puzzles
लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे आणि स्मार्ट चॅम्प्स पुणेच्या वतीने आयोजित ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन आमटे यांच्या हस्ते झाले. १ मे पर्यंत रोज दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत सोलारिस फिटनेस क्लब, मयूर कॉलनी कोथरूड येथे हे प्रदर्शन होणार आहे. उद्घाटनावेळी लोक बिरादरी मित्र मंडळ ट्रस्टच्या विश्वस्त ऐश्वर्या चपळगावकर, शिल्पा तांबे, सदस्य अमेय देशपांडे, सोलारीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश भानुशाली, स्मार्ट चॅम्प्स पुणेचे रविंद्र नाईक, रौनक नाईक आदी उपस्थित होते.
World of Puzzles
अनिकेत आमटे म्हणाले, “शहरी भागातील मुलांना विविध खेळ, खेळण्या, प्रयोगशाळा सहज उपलब्ध होतात. भामरागड सारख्या आदिवासी भागातील शाळांमधील मुलांना अशा गोष्टी मिळत नाहीत. तेथील शाळेत अशी खेळण्याची विशेष लॅब उभारण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या ‘पझल’ प्रयोगशाळा गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणार्‍या तीन शाळांमध्ये उभारण्यासाठी याची मदत होईल. तसेच पुण्याच्या मुलांना आदिवासी मुलांशी जोडण्याचा आणि आदिवासी मुलांनाही अशा प्रकारचे अभिनव बौद्धिक प्रेरणा देणारे उपक्रम शिकायला मिळतील “
World of Puzzles
रौनक नाईक म्हणाले, “हे प्रदर्शन वय वर्ष ३ ते ९९ या वयोगटासाठी आहे. येथे तीन दिवस आपल्याला एक बौद्धिक सहल घडणार आहे. यातून प्रेक्षकांना विविध कोडी आणि बोर्ड गेम्सचे आकर्षक नमुने अनुभवायला मिळतील. शाब्दिक, गणिती, खेळ, बौद्धिक क्रीडाप्रकार एकल व समूह स्वरूपात असणार आहेत.”

Tags: Aniket AmteGameLokbiradari Mitramandal TrustmuktpeethpuneSmart Champ PuneWorld of Puzzles and Brain Games 3.0अनिकेत आमटेखेळपुणेमुक्तपीठलोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्टवर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.० प्रदर्शनस्मार्ट चॅम्प पुणे
Previous Post

“डॉक्टर, आरोग्य सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेतून बाहेर नाहीत! तक्रार शक्य!”

Next Post

‘राज’सभास्ठानाची अमित ठाकरेंकडून पाहणी, केसेस अंगावर घेण्याची तयारी!

Next Post
Amit Thackeray

'राज'सभास्ठानाची अमित ठाकरेंकडून पाहणी, केसेस अंगावर घेण्याची तयारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!