मुक्तपीठ टीम
अमेरिकन स्त्रिया पुरुषांसोबत शारिरीक संबंध न ठेवण्याची धमकी देत आहेत. त्या ‘सेक्स स्ट्राइक’बद्दल उघडपणे बोलत आहेत. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गर्भपाताच्या निर्णयाला विरोध वाढत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार संपुष्टात आला आहे. आता २६ राज्यांना गर्भपातावर बंदी घालण्याची परवानगी मिळाली आहे. महिला त्यांचा अधिकार हिरावला गेल्याने संतापल्या आहेत.
गर्भपाताचा अधिकार ही फेडरल कायदा होईपर्यंत महिलांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंधांपासून ठेवणार नसल्याचं बजावलं आहे. सोशल मीडियावर देशभरात सेक्स स्ट्राइकची मागणी जोर धरू लागली आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, “अमेरिकन महिलांनी, ही शपथ घ्या. कारण आम्ही अनपेक्षित गर्भधारणा मान्य करू शकत नाही. म्हणूनच आम्ही कोणत्याही पुरुषाशी, अगदी आमच्या पतीसोबत सेक्स करणार नाही, जोपर्यंत आम्हाला गरोदर व्हायचे नाही.”
#SexStrike आणि #abstinence ट्रेंडिंग
एका यूजरने म्हटले की, मी न्यूयॉर्कमध्ये राहते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे. मी अशा लोकांना शोधत आहे जे सेक्स स्ट्राइकचे समर्थन करत आहेत. ही आमची ताकद आहे. गर्भपाताचा अधिकार हा फेडरल कायदा होईपर्यंत लैंगिक संबंध ठेवू शकत नाही. #SexStrike सोबत #abstinence देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. जोपर्यंत महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवू नयेत, असे म्हणत आणखी एका महिलेने देशव्यापी सेक्स स्ट्राइकची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महिलांचा आक्रोश
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लोकही रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे.
- अॅरिझोना कॅपिटलच्या बाहेरील आंदोलकांना घालवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
- आंदोलकांनी सिनेट इमारतीच्या काचेच्या दारांना ढकलण्यास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. निदर्शनामुळे सिनेटर्सना काही काळ इमारतीच्या आत तळघरात राहावे लागले.