Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमदार निलेश लंकेंवर तहसीलदार महिलेचे आरोप, तर इंदोरीकर महाराजांकडून समर्थन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jyoti deore

मुक्तपीठ टीम

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ माजली आहे. आपल्या पक्षाच्या आमदाराच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते स्वाभाविकपणे पुढे सरसावले. पण आता त्यात नवे नाव आले आहे ते काहीवेळा वादग्रस्तही ठरलेले प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं. इंदोरीकर महाराजांनी निलेश लंकेंचं समर्थन केलं आहे. तर त्याचवेळी तहसीलदार संघटना ज्योती देवरेंसाठी मैदानात उतरली आहे.

 

काय म्हणाले किर्तनकार इंदोरीकर महाराज?

  • पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने कोरोना सेंटर उभारलेले आहे.
  • या कोरोना सेंटरमध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या सप्ताहात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले.
  • या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी लंके यांचे कौतुक करत त्यांना अनेक सल्ले दिले.
  • “चांगले काम करताना त्रास होतोच.
  • यात कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा.
  • “बरा झालेला प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देत आहे.
  • त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे आशीर्वादाचे शब्द लंके यांच्यासाठी अमृतासमान आहेत.
  • तसेच लोकांच्या या आशीर्वादाच्या जोरावर लंके पुढील २५ वर्षे राजकारणात सहज टिकून राहतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केलाय.
  • एवढी लोकप्रियता मिळूनही लंके यांचे पाय जमिनीवर आहेत.
  • तालुक्यात ते सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वावरत आहेत.
  • कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत.
  • याचे फळ त्यांना नक्की मिळणार आहेत.

 

ज्योती देवरेंचे निलेश लंकेंवर गंभीर आरोप

  • अहमदनगरमधील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
  • ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
  • आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवेरे यांनी या क्लिपमध्ये निवेदन दिलं आहे.
  • शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाली.
  • मी लवकरच तुध्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात होणारा छळ, लोकप्रतिनिधीकडून होणार त्रासासंबंधित आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
  • पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.

 

आमदार निलेश लंकेंचे तहसीलदार देवरेंवरच गंभीर आरोप

त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.


Tags: jyoti deoreNCPncp mla Nilesh lankeइंदोरीकर महाराजज्योती देवरेदीपाली चव्हाणनिलेश लंके
Previous Post

जातनिहाय जनगणना झाली तर नेमके काय घडेल? कोणाला फायदा?

Next Post

काँग्रेसच्या मंत्र्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
congress

काँग्रेसच्या मंत्र्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!