Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसच्या मंत्र्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
congress

मुक्तपीठ टीम

राज्यातील आघाडी सरकारमधील तीन पक्षांमधील मतभेदांची चर्चा सातत्यानं रंगत असतानाच आता काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले स्फोटक पत्र काँग्रेसमध्ये राजकीय स्फोट घडवणारं ठरू शकतं. या पत्रात चक्क काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुखांनी स्वत:च्याच पक्षाच्या मंत्र्याला लक्ष्य केले आहे. ‘राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे’, अशी थेट मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुखांचं पत्र जसं आहे तसं…

प्रति,
दि. २२.०८.२०२१
श्री. उद्धवजी ठाकरे,
मा.मुख्यमंत्री, विधी व न्यायमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मुंबई.

विषय- नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील सरकारी वकील अॅड. आसिफ क्युरेशी यांना बदलण्याबाबत.

प्रिय श्री उद्धवजी ठाकरे,

आपल्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील एक मंत्री श्री सुनील केदार यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि गैर कारभाराबद्दल हे पत्र लिहिताना मला अतिशय दुःख होत आहे.
सन २००२ मध्ये सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे १५० कोटी रुपये खाजगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली व पूर्ण रक्कम बँकेला गमवावी लागली. या दलाल कंपन्यांमधये Home Trade Securities, Giltage, Management, Syndicate Management Services, Indramani Merchants, Century Dealers, इत्यादी पाच दलाल कंपन्यांना सुनील केदार यांनी संगनमताने ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी परस्पर दिली होती. या दलालांनी त्या संपूर्ण रकमेचा अपहार करुन बँकेला ना रोखे दिले ना पैसे परत दिले व नागपूर जिल्हा बैंकेचे १५० कोटीचे नुकसान झाले.
याबद्दल सुनील केदार व ईतर १० आरोपी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने १५० कोटी रुपयाचा अपहार केल्याबद्दल कोर्टात खटला दाखल केलेला आहे आणि तो सध्या सुनावणी च्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. याठिकाणी विशेष म्हणजे सुनील केदार यांनी केवळ नागपूर जिल्हा बँकेचे १५० कोटीचे नुकसान केले नसून २००२ साली त्यांचे मित्र शरद देशमुख अध्यक्ष असलेल्या वर्धा जिल्हा बँकेला सुद्धा ३० कोटी रुपये या कंपन्यांमध्ये गुंतवण्यासाठी दबाव टाकला. असाच प्रकार केदार यांनीउस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष कै. पवनराजे निंबाळकर यांच्या बाबतीत केला व त्यांना सुद्धा ३० कोटी रुपये गमवावे लागले. अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख जिल्हा बँकांचे २१० कोटी रुपये (मुद्दल) सुनील केदार यांच्यामुळे नुकसान झालेले आहे. आणि आज १९ वर्षानंतरही या तिन्ही जिल्हा बँका आज आर्थिक दुर्बल झाल्या आहेत व केव्हा बंद पडतील याचा नेम नाही.
या व्यतिरिक्त सुनील केदार यांनी सप्टेंबर २००० मध्ये अध्यक्ष असताना नागपूर जिल्हा बँकेचे ४० कोटी रुपये Home Trade Securities चे अध्यक्ष असलेल्या संजय अग्रवाल यांच्या Euro Discover Technologies नावाच्या कंपनीला गुंतवणूक म्हणून दिले होते. या व्यवहारात बँकेने युरो डिस्कव्हरचे पाच लाख शेअर्स ८०० रुपये भावाने विकत घेतले होते. पण यातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे कोणत्याही जिल्हा सहकारी बँकेला खासगी कंपनीमध्ये अशा पद्धतीने पैसे गुंतवता येत नाहीत किंवा खाजगी कंपनीचे शेअर विकत घेता येत नाहीत. तो बँकेच्या पैशाचा अपहार आहे आणि सुनील केदार यांनी हा गुन्हा केलेला आहे.
विशेष म्हणजे युरो डिस्कव्हरने नागपूर जिल्हा बँकेच्या ४० कोटी गुंतवणूकीतूनच आपला व्यवसाय उभा केला व शेवटी नागपूर जिल्हा बैंकेसकट महाराष्ट्रातल्या १२ बँकांना जवळपास ४०० कोटींचा चूना लावला. सुनील केदारांच्या फाजील आत्मविश्वासामुळे या बँकांचे हे प्रचंड नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे सहकार खात्याचे तीन अंकेक्षक, भाऊराव आस्वार, यशवंत बागडे आणि डॉ सुरेंद्र खरबडे यांनी या महाघोटाळ्यासाठी सुनील केदार यांना मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरविले आहे.
तसेच या घोटाळ्याचे तपास अधिकारी पीआय किशोर बेले यांनी आपल्या जबानीत सुध्दा सुनील केदारांचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे.
महोदय, हे सगळे गैरप्रकार सुनील केदार यांनी बँकेमध्ये केलेले असताना व गेले १९ वर्ष त्यांच्याविरुद्ध सहकार खात्याने खटला दाखल केल्यानंतरही सुनील केदार भारताच्या जनप्रतिनिधी कायद्यातील एका पळवाटेचा फायदा घेऊन सावनेर मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे आणि आज आपल्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.
खरे तर पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत लाजिरवाणी ही बाब आहे की ज्या व्यक्तीने महाराष्ट्रातील तीन जिल्हा बँक बुडवल्या त्या व्यक्तीला मंत्री म्हणून महाराष्ट्रभर मिरवण्याची संधी मिळते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हा खटला प्रलंबित ठेवण्यासाठी सुनील केदार यांनी छोट्या, छोट्या कारणांसाठी सर्वौच्च न्यायालयापर्यत जाऊन स्वतः विरुध्द चा हा खटला गेली १९ वर्षे प्रलंबित ठेवला आहे. हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे.
आता या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना त्यातून सुटण्यासाठी सुनील केदार वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. सरकारी वकील म्हणून एडवोकेट ज्योती वजानी असताना मार्च २०२१ मध्ये त्यांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी केदार यांनी आपले विश्वासू मित्र एडवोकेट आसिफ कुरेशी यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करून घेतलेली आहे. उद्देश एकच आहे कि केदार यांच्याविरुद्ध मित्र असल्यामुळे एडवोकेट कुरेशी जोरकसपणे कोर्टात बाजू मांडणार नाहीत आणि त्यामुळे केदारांना या केसमधून निर्दोष सुटता येणे शक्य होणार आहे. खरे तर एड आसिफ कुरेशी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे ते अशा प्रकारची नेमणूक स्वीकारु शकत नाहीत कारण तो Conflict of interest चा भंग ठरतो. त्यामुळे ही नेमणूक तातडीने रद्द होणे आवश्यक आहे.
आमची मागणी आहे की आसिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करून त्यांच्या जागी एड. उज्वल निकम यांच्या सारखा एखादा सक्षम सरकारी वकील द्यावा, जेणे करुन तीन जिल्हा बँका बुडवणाऱ्या सुनील केदार यांना कोर्टा द्वारे शासन होण्याची प्रक्रिया पार पडू शकेल. अन्यथा राज्याचा मुख्यमंत्री तसेच विधी व न्यायमंत्री म्हणून आपल्याला लोक जबाबदार धरू शकतील.
महोदय, सुनील केदार यांचा पूर्वेतिहास हा नेहमीच गुन्हेगारीचा राहिलेला आहे.
अशी चारित्र्यहीन व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहणे ही खरंतर महाराष्ट्रासाठी एक लांच्छनास्पद बाब आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की केदार यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावे आणि त्यांच्याविरुद्ध खटला स्वतंत्रपणे नागपूर कोर्टात चालवून त्यांना या घोटाळ्याप्रकरणी योग्य ते शासन देण्याचा मार्ग सुकर करावा.

आपला,
डॉ. आशिष देशमुख
माजी आमदार (विधानसभा-काटोल),
Member, Parliamentary Board
Maharashtra Pradesh Congress Committee

कोण आहेत आशिष देशमुख?

  • २०१४ मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार होते.
  • राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता.
  • अनिल देशमुख हे आशिष देशमुखांचे काका आहे.
  • या दोघांमधील वाद संपूर्ण राज्याला माहित आहे.
  • आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.
  • माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.
  • २०१९ मध्ये त्यांनी भाजपामधून सोडचिट्टी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली.
  • परंतु त्यांचा पराभव झाला.

Tags: Ashish Deshmukhcm uddhav thackeraySUNIL KEDARआशिष देशमुखकाँग्रेसक्रीडामंत्री सुनील केदारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

आमदार निलेश लंकेंवर तहसीलदार महिलेचे आरोप, तर इंदोरीकर महाराजांकडून समर्थन!

Next Post

आमदार लंकेंविरोधातील तहसीलदार ज्योती देवरेंच्या आरोपांची वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी

Next Post
NCP

आमदार लंकेंविरोधातील तहसीलदार ज्योती देवरेंच्या आरोपांची वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!