मुक्तपीठ टीम
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ माजली आहे. आपल्या पक्षाच्या आमदाराच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते स्वाभाविकपणे पुढे सरसावले. पण आता त्यात नवे नाव आले आहे ते काहीवेळा वादग्रस्तही ठरलेले प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं. इंदोरीकर महाराजांनी निलेश लंकेंचं समर्थन केलं आहे. तर त्याचवेळी तहसीलदार संघटना ज्योती देवरेंसाठी मैदानात उतरली आहे.
काय म्हणाले किर्तनकार इंदोरीकर महाराज?
- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने कोरोना सेंटर उभारलेले आहे.
- या कोरोना सेंटरमध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
- या सप्ताहात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले.
- या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी लंके यांचे कौतुक करत त्यांना अनेक सल्ले दिले.
- “चांगले काम करताना त्रास होतोच.
- यात कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा.
- “बरा झालेला प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देत आहे.
- त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे आशीर्वादाचे शब्द लंके यांच्यासाठी अमृतासमान आहेत.
- तसेच लोकांच्या या आशीर्वादाच्या जोरावर लंके पुढील २५ वर्षे राजकारणात सहज टिकून राहतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केलाय.
- एवढी लोकप्रियता मिळूनही लंके यांचे पाय जमिनीवर आहेत.
- तालुक्यात ते सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वावरत आहेत.
- कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत.
- याचे फळ त्यांना नक्की मिळणार आहेत.
ज्योती देवरेंचे निलेश लंकेंवर गंभीर आरोप
- अहमदनगरमधील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
- ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
- आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवेरे यांनी या क्लिपमध्ये निवेदन दिलं आहे.
- शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाली.
- मी लवकरच तुध्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात होणारा छळ, लोकप्रतिनिधीकडून होणार त्रासासंबंधित आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
- पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.
आमदार निलेश लंकेंचे तहसीलदार देवरेंवरच गंभीर आरोप
त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.