मुक्तपीठ टीम
पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात एक वेगळाच गुन्हा दाखल झाला आहे. आजवर शरीर संबंधांच्या जबरदस्तीचा गुन्हा महिलांकडून पुरुषांविरोधात नोंदवला जात असे. तेथे मात्र, एका महिलेवर तरुणाला फसवणून सक्तीनं शरीर संबंध ठेवल्याचा आरोप झाला आहे. प्रकरण तेवढ्यावर थांबलेले नाही. त्या महिलेच्या साथीदारांना तरुणाकडून रोख रक्कमही लुबाडल्याचा आरोप आहे.
पुण्यात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका महिलेने इंस्टाग्रामवर एका मुंबईतील तरुणाशी मैत्री केली. त्याला पुण्यात भेटायला बोलावून त्याच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर जबरदस्तीचा आरोप करत आपल्या काही साथीदाराच्या मदतीने महिलेने त्या तरुणाचे ७० हजार रुपये काढून घेतले, असा गुन्हा त्या पीडित तरुणाच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे.
महिलेवर शरीर संबंध ठेवल्याचा आरोप
- महामुंबईतील पनवेल भागातील ३१ वर्षीय तरुणाची इंस्टाग्रामवर पुण्यातील एका महिलेशी मैत्री झाली होती.
- याच मैत्रीतून या महिलेने तरुणाला कोंढवा परिसरात भेटण्यासाठी बोलावले.
- हा तरुण उत्साहाने ७ ऑगस्ट रोजी महिलेला भेटण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथील येवलेवाडी येथे पोहोचला.
- यानंतर महिलेने जबरदस्तीने त्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवले.
जबरदस्तीच्या संबंधांनंतर लूटमार!
- जेव्हा तो तरुण आपल्या कारने घरी परत जात होता.
- तेव्हा, अचानक तिघांनी वाटेत त्याची कार थांबवली आणि जबरदस्तीने त्यात बसून त्या तरुणाला मारहाण केली.
- यानंतर आरोपी तरुणाला सांगू लागले की ‘तू या महिलेवर बलात्कार केला आहेस, आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू’.
- हे बोलताना आरोपीने त्या तरुणाला धमकी देण्यास सुरुवात केली की जर त्याने पैसे दिले नाही तर त्याला त्या महिलेशी लग्न करावे लागेल.
- आरोपींनी साध्या कागदावर तरुणांची स्वाक्षरीही करून घेतली.
- या घटनेने हादरलेला हा तरुण कसा तरी त्याच्या घरी पोहोचला.
- परंतु यानंतरही वारंवार पैशाची मागणी केल्याने या तरुणाने पोलिसात धाव घेतली.
- तरुणाने कोंढवा येथे जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
- पोलिसांनी महिला आणि तिच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे