Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

७५ वर्षांपूर्वी घेतलेलं ८८ रुपयाचं सोनं आता ४८ हजाराचं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gold

मुक्तपीठ टीम

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु झाला आहे. या ७५ वर्षात देशात खूप काही बदल झाले आहेत. पण बदललं नाही ते सोन्याचं महत्व. मिरवण्याबरोबरच गुंतवणुकीसाठी सोनंच सर्वाधिक पसंतीचं राहिलं आहे. त्यामुळेच गेल्या ७५ वर्षात सोनं हे ५४१ पटीत महागलं आहे. याचा अर्थ स्वातंत्र्यापूर्वी एक रुपयाला घेतलेल्या सोन्याची आजची किंमत तब्बल ५४०० रुपये झाली आहे! तोळ्याच्या हिशेबात सांगायचं तर ८८ रुपये ६२ पैशांना घेतलेलं एक तोळं सोनं आता ४८ हजार रुपये किंमतीचं झालं आहे.

 

७५ वर्षांमध्ये सोन्याचा लखलखाट वाढला!

  • स्वातंत्र्यापूर्वीच्या आजच्या सोन्याच्या किंमतीत भलामोठा बदल झाला आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ८८.६२ रुपये होती, जी आज ४८,००० च्यावर गेली आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या गुंतवणूकदारांनी इक्विटी, बॉण्ड्ससारख्या गुंतवणुकीच्या तुलनेत खूप चांगला नफा कमावला आहे.
  • विशेषतः २००८ नंतर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

 

८८ रुपये ते ४८ हजार!

  • भारतीयांसाठी सोने हा केवळ व्यावहारिक गुंतवणुकीचा नाही तर भावनात्मक गुंतवणीचाही विषय आहे.
  • त्यामुळे स्वातंत्र्याच्या आधीपासूनच भारतीयांनी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आहे.
  • १९४७ मध्ये सोन्याची सरासरी किंमत ८८.६२ रुपये प्रति १० ग्रॅम होती.
  • आज १० ग्रॅमसाठी ४८,००० च्या पुढे पैसे मोजावे लागत आहेत.

 

सोन्यावर प्रचंड परतावा!

  • या काळात सोन्यावर सुमारे ५४५ पट परतावा मिळाला आहे.
  • २००८ मध्ये मंदीच्या काळात लोकांना सोन्यात गुंतवणूक करणे हा सुरक्षित मार्ग असल्याचं लक्षात आलं.
  • २००८ मध्ये सोन्याची किंमत १२,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होती. परंतु यानंतर, जागतिक स्तरावर सोन्यातील गुंतवणूक वाढली, ज्यामुळे किमंती वाढल्या आणि आज किरकोळ सराफा बाजारात सोन्याची विक्री ४८,००० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे होत आहे.
  • गेल्या १३ वर्षात सोन्याच्या किंमतीत २७२ पटीने वाढ झाली आहे.

 

सोन्याची गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी फायद्याची!

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असावा. त्यामुळे जास्त चांगला फायदा मिळेल. त्यांच्या मते, जर तुम्ही सोन्यात ९ ते १० साठी गुंतवणूक केली तर तुम्हाला सोन्यावर १०% परतावा मिळेल असे समजा. या व्यतिरिक्त, त्यांनी सल्ला दिला की भौतिक सोन्याबरोबरच ईटीएफ, गोल्ड बाँड सारख्या पर्यायांचाही विचार केला पाहिजे.

 

पुढचे ५ वर्ष कसे असतील?

  • तज्ज्ञांच्या मते भारतीय रुपयांमध्ये ७८ हजार ते १,३१,०० रुपयांच्या दरम्यान असू शकतात.
  • आंतरराष्ट्रीय सुवर्ण तज्ज्ञ डिएगो पॅरिला यांनी २०१६ मध्ये भाकीत केले होते की, सोने ५ वर्षात त्याच्या विक्रमी पातळीवर असेल.
  • आणि त्याचा अंदाज गेल्या वर्षी बरोबर ठरला, आता ७८ हजार ते १ लाख ३१ हजाराचा अंदाजही त्यांनीच वर्तवला आहे.
  • मात्र, जर तिसरी लाट आली नाही, तर सोन्यात फारशी उलथापालथ अपेक्षित नाही.

Tags: GoldIndiaईटीएफभारतसोनं
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७२१ जागांसाठी भरती

Next Post

पुण्यात भलताच गुन्हा, महिलेवर मुंबईकर तरुणावर जबरदस्तीचा आरोप!

Next Post
pune

पुण्यात भलताच गुन्हा, महिलेवर मुंबईकर तरुणावर जबरदस्तीचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!